Navi Mumbai News : जुलै महिन्यात जवळ जवळ संपूर्ण राज्यात पावसाने विक्रमी हजेरी लावली आहे. मात्र काही शहरांवर अजूनही पाणीकपातीचं संकट घोंघावत आहे. अशातच नवी मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आज नवी मुंबईतील अनेक परिसरातील घरांमध्ये संध्याकाळनंतर नळाचं पाणी गायब होणार आहे. (water supply stopped in navi mumbai on tuesday 8 august Water Cut news in marathi)


नवी मुंबईत आज पाणीपुरवठा बंद 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खारघर आणि कोमोठे नवी मुंबई महानगरपालिका (NMMC) परिसरात आज सायंकाळी पाणीपुरवठा होणार नाही आहे. कारण मुख्य जलवाहिनी दुरुस्ती काम नवी मुंबई महानगरपालिका पाणी पुरवठा विभागाने हाती घेतलं आहे. 


भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र आज सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. त्यामुळे आज संध्याकाळनंतर नवी मुंबईकरांना पाणी पुरवठा होणार नाही. तर बुधवारी 9 ऑगस्टला सकाळपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होईल असं नवी मुंबई महापालिका पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आलं आहे. 


'या' परिसरात पाणी येणार नाही


बेलापूर
नेरुळ
वाशी
तुर्भे
सानपाडा
कोपरखैरणे
घणसोली
ऐरोली


त्यामुळे नागरिकांनी या काळात पाणी जपून वापरण्याचं आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे.