मुंबई : मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. रविवारी 27 नोव्हेंबरला मुंबई उपनगरीय रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक (Mumbai Local Mega Block) घेण्यात येणार आहे. त्यानुसार पश्चिम, मध्य आणि हार्बर मार्गावर या 3 मार्गावर हा मेगाब्लॉक असणार आहे. त्यामुळे जर रविवारी तुम्ही अनेक कारणामुळे रेल्वेने प्रवास करण्याच्या बेतात असाल, तर ही बातमी वाचूनच बाहेर पडा.  (western central and harbour mumbai local railway mega block sunday 27 november 2022 know details)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रेल्वे प्रशासनाकडून दर रविवारी दुरुस्तीच्या, सिग्नल यंत्रणेतील सुधाराच्या कामासाठी मेगाब्लॉक घेत असतं. त्यानुसार मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. हार्बर मार्गावरील चुनाभट्टी ते वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येईल. पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल अप-डाऊन जलद मार्गावरही मेगाब्लॉक असेल.  


पश्चिम रेल्वेवर असा असेल मेगाब्लॉक


पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान अप-डाऊन या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक असेल.  सकाळी 10 वाजून 35 मिनिटं ते दुपारी 3 वाजून 35 मिनिटांदरम्यान हा 5 तासांचा मेगाब्लॉक असणार आहे. या मेगाब्लॉक दरम्यान रेल्वे वाहतूक ही चर्चगेट-मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येईल. यामुळे अप आणि डाऊन या मार्गावरील काही फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.  


मध्य रेल्वे 


मध्य रेल्वे मार्गावर (Central Railway) माटुंगा-मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 3.55 पर्यंत मेगाब्लॉक असेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.25 ते दुपारी 3.35 पर्यंत  सुटणाऱ्या डाउन जलद सेवा माटुंगा आणि मुलुंड दरम्यान डाउन धीम्या मार्गावर वळवल्या जातील. तसेच ठाण्याच्या पुढे  जलद असलेल्या गाड्या मुलुंड येथे डाउन जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील. ठाणे येथून सकाळी 10.50 ते दुपारी 3.46 वाजेपर्यंत अप जलद सेवा मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहे.


हार्बर रेल्वे 


छशिमट (Csmt) चुनाभट्टी/वांद्रे डाउन  हार्बर मार्गावर सकाळी 11.40 ते सायंकाळी 4.40 पर्यंत मेगाब्लॉक असेल. तर चुनाभट्टी/वांद्रे- छशिमटर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते संध्याकाळी 4.10 पर्यंत वाहतूक सेवा बंद राहिल. 


छशिमट/वडाळा रोड इथून सकाळी 11 वाजून 16 मिनिट ते संध्याकाळी 4 वाजून 47 मिनिटांपर्यंत वाशी/बेलापूर/पनवेल करता आणि छशिमट सकाळी 10.48 ते संध्याकाळी 4.43 वाजेपर्यंत वांद्रे/गोरेगावसाठी सुटणारी डाउन हार्बर मार्गावरील वाहतूक सेवा बंद असेल. 


पनवेल/बेलापूर/वाशीइथून सकाळी 9.53 ते दुपारी 3.20 पर्यंत छशिमटसाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे इथून सकाळी 10.45 ते संध्याकाळी 5.13 पर्यंत छशिमट सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहिल. 


मेगाब्लॉक दरम्यान पनवेल ते कुर्ला या मार्गावर फलाट क्रमांक 8 वरुन विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहे. तसेच हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी 10 ते संध्याकाळी 6 पर्यंत मेन आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवासाची परवानगी आहे.