मुंबई : १ ऑक्टोबर पासून पश्चिम रेल्वेकडून ३२ नव्या ट्रेन्स चालवण्यात येणार आहे. या नव्या ट्रेन्स अंधेरी ते विरार दरम्यान चालवण्यात येणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सबर्बन ट्रॅक अव्हॉइडिंग म्हनजेच पाचव्या लाईनवर गेल्या वर्षी यशस्वी चाचणी झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. नव्या ३२ ट्रेन्सपैकी ९ ट्रेन्स या मार्गावर चालवल्या जातील.  


पश्चिम रेल्वे प्रमाणेच मध्य रेल्वेदेखील लवकरच  ४० नव्या फेऱ्या वाढवण्याच्या विचारात आहेत.सध्या पश्चिम रेल्वेवर १५ डब्यांच्या ४२ ट्रेन्स चालवल्या जात आहेत. १ ऑक्टोबरबासून १५ डब्यांच्या गाड्यांमध्ये वाढ करून ही  संख्या ५४ होणार आहे.


पुढील टप्प्यात पश्चिम रेल्वेप्रमाणे मध्य रेल्वेच्या प्रवाशांनादेखील दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मध्य रेल्वेची ४० नव्या फेऱ्या वाढवण्याची योजना आहे.