पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, घरी जाणाऱ्या मुंबईकरांचे हाल
पश्चिम रेल्वेची लोकलसेवा विस्कळीत. वांद्रे इथं डाऊन मार्गावर रेल्वे रुळाला तडा गेल्याने ही वाहतूक विस्कळीत झाली.
मुंबई : पश्चिम रेल्वेची लोकलसेवा विस्कळीत झाली आहे. वांद्रे इथं डाऊन मार्गावर रेल्वे रुळाला तडा गेल्याने ही वाहतूक विस्कळीत झाली. त्यामुळे रेल्वेची जलद वाहतूक अर्ध्या तासापासून बंद होत्या. तर वांद्रे धीम्या मार्गावर लोकल ठप्प झाली होती. रात्री उशिरा वाहतूक पूर्वपदावर आली आहे..
पश्चिम रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. तसेच टॅक्सी चालकही वांद्रापुढे जाण्यास तयार नसल्याने अनेक प्रवाशांना स्टेनशमध्येच अडकून पडावे लागले. लोकल सुरु झाल्यानंतर घरची वाट धरली.
२० ते ३० मिनिटे लोकल उशिराने धावत होत्या. रेल्वेच्या सूत्रांनुसार, रेल्वे रुळाला तडा गेल्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली आहे, अशी माहिती देण्यात आली. प्रवाशांच्या तक्रारीनंतर बिघाड दूरुस्तीचे काम सुरु करण्यात आले आहे. प्रवाशांकडून पश्चिम रेल्वेला ट्विट करुन याबाबत कळविण्यात आले.