सत्तास्थापनेसाठी शिवसेनेपुढे काय असतील प्रस्ताव?
शिवसेना वेट अँड वॉचच्या भूमिकेत
मुंबई : कन्फ्युजनही कन्फ्युजन है, सोल्युशन कुछ पता नही, अशी अवस्था भाजप आणि शिवसेनेची आहे. हे घोडं पुढे जाण्यासाठी वेगवेगळ्या प्रस्तावांची चर्चा आहे. भाजपाकडून अजूनही शिवसेनेशी बोलणी सुरू असल्याचं सांगण्यात येतं आहे. पण शिवसेना वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे. आता सगळं लक्ष आहे ते देवेंद्र फडणवीस काय करणार याकडे लागलं आहे.
काय असतील शिवसेनेपुढे प्रस्ताव ?
१. शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपदासह १६ मंत्रिपदं
२. शिवसेनेला ८ कॅबिनेट मंत्रिपदं आणि ८ राज्यमंत्रीपदं
३. केंद्रात एक मंत्रिपद आणि राज्यात निम्मी निम्मी मंत्रिपदं
४. एक भाजपचा आणि शिवसेनेचा असे दोन उपमुख्यमंत्री
५. महायुतीची एक समिती तयार करावी, ज्याचं अध्यक्षपद उद्धव ठाकरेंकडे असेल. या समितीच्या सल्ल्यानं सरकार काम करेल.
अशा वेगवेगळ्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्यापासून पुन्हा ओला दुष्काळ पाहणीसाठी मराठवाडा दौऱ्यावर जात आहेत. नांदेड, लातूर, बीड, औरंगाबाद जिल्ह्यातील ७ ते ८ तालुक्यातील शेतकऱ्यांची भेट घेणार आहेत. ओला दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांना आधार देण्यासाठी उद्धव ठाकरे थेट बांधावर जाणार आहेत. त्यांच्यासोबत शिवसेना नेते सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, चंद्रकांत खैरे यांच्यासह मराठवाड्यातले सर्व शिवसेना आमदार दौऱ्यात सहभागी होणार आहेत.