मुंबई : कथित गोरक्षकांचे हल्ले रोखण्यासाठी सरकारनं काय उपाययोजना केल्या आहेत याची प्रतिज्ञापत्राद्वारे 2 दिवसांत माहिती द्या, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गोरक्षकांसंदर्भात मार्गदर्शक तत्वं तयार करण्यात यावीत अशी याचिका, याचिकाकर्ते शादाब पटेल यांनी उच्च न्यायालयात दाखल केली होती. एमआयएमचे आमदार वारीस पठाण यांनी याचिकाकर्त्यांचे वकील म्हणून न्यायालयात युक्तीवाद केला. 


२ सप्टेंबरला बकरी ईद असून त्याच दरम्यान गणेशोत्सव असल्यानं कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थीती निर्माण होऊ नये याकरता, न्यायालयानं मार्गदर्शक तत्वं जारी करावीत अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली. दरम्यान याचिकाकर्ते शादाब पटेल यांनी ही याचिका प्रसिद्धी मिळवण्यासाठी केली असल्याचं सांगत, शादाब पटेल यांचे वडील शब्बीर पटेल यांनी या याचिकेत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला.