मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून बंद असलेली मोनो रेल मे किंवा जूनमध्ये पुन्हा ट्रॅकवर येण्याची शक्यता आहे. दुसऱ्या टप्प्यात मोनो रेलने सुरक्षेचे सर्व निकष पूर्ण केले असून आता राज्य सरकराच्या परवानगीची प्रतिक्षा असल्याच सांगण्यात येतंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोनो रेलचे अधिकचे सुटे भाग आणि इतर आवश्यक बाबींची पूर्तता झाल्यानंतर मोनो रेल धावण्याचा मार्ग मोकळा होईल असं सांगितल जातंय. 


त्याचबरोबर मोनो रेल पुन्हा सुरू झाल्यानंतर तिकीटांचे सुधारीत दर लागू केले जातील असं MMRDA च्या वतीनं सांगण्यात आलंय.