कृष्णात पाटील, झी २४ तास, मुंबई : 'मुंबईचे खड्डे कसे गोलगोल...' हे गाणं कानावर पडलं की महापालिका अधिकारी, कर्मचारी चांगलेच चपापतात. पावसाळ्याच्या तोंडावर मलिष्काचं आणखी एक गाणं नको रे बाबा... म्हणून महापालिकेनं थेट मलिष्काला बोलावून केलेली कामं दाखवलीत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मलिष्काच्या गाण्यांनी महापालिकेचा कारभार पुरता वेशीला टांगला... मलिष्काचा एवढा धसका महापालिकेनं घेतला की नको रे बाबा मलिष्काची गाणी नकोत, म्हणून मलिष्काला विशेष आमंत्रण देत मान्सूनपूर्व कामं दाखवली. पालिका आयुक्त प्रविण परदेशी, अतिरिक्त महापालिका आयुक्त विजय सिंघल, आबासाहेब जऱ्हाड आणि आणि बड्या अधिकाऱ्यांची फौज मलिष्काच्या दिमतीला होता.



'मुंबई की रानी मलिष्का जेव्हा महानगरपालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांना भेटते तेव्हा...' असं म्हणतं बीएमसीनं याचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर केलाय. 


गेली दोन वर्षं मलिष्काच्या गाण्यानं मुंबईत धुमाकूळ घातला होता. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भर पावसाळ्यात मलिष्काचं तिसरं गाणं आलं तर...? पुढे काय वाढून ठेवलंय याचा अंदाज शिवसेनेला आला होता. विरोधकांनी मात्र यावर तोंडसुख घेतलंय. 



पण आता तरी मलिष्काला बीएमसीवर भरोसा आहे का? हे तिलाच माहीत...