भिवंडी : भिवंडी हायवे दिवे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून बनविण्यात आलेल्या कै. मनीबाई मोरेश्वर पाटील बलोद्यानचे लोकार्पण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील ( Kapil Patil ), आमदार निरंजन डावखरे ( Niranjan Davkhare ) आदी उपस्थित होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय जनता पार्टी सक्षम आहे. आम्ही पोलखोल यात्रा सुरू केलीय. दररोज पोलखोल करतोय. त्यामुळे सरकार आणि सरकारमधील पक्ष व्यथित झाल्यामुळे आमच्या पोलखोल यात्रेवर हल्ले केले जात आहेत. पण, आम्ही घाबरणार नाही त्यांनी कितीही हल्ले केले तरी आम्ही सरकारच्या भ्रष्टाचाराची दररोज पोलखोल करीत राहणार असे ते म्हणाले.


राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ( Jayant Patil ) यांनी राज ठाकरे ( Raj Thackrey ) हे भाजपच्या हातचे बाहुले आहे असे वक्तव्य केले. याबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे त्यांच्यासोबत होते. तेव्हा त्यांचे बोल त्यांना गुलुगुलु वाटत होते. तेव्हा गुदगुल्या होत होत्या. 


आता राज ठाकरे सत्य बोलायला लागले तर त्यांना खाजवायला होतंय. राज ठाकरे यांचा घाव वर्मी लागतोय. भारतीय जनता पार्टीला कोणालाही समोर करायची गरज नाही, असे वक्तव्य विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं.