...जेव्हा टाटा, अंबानींच्या घरात पाण्याचा तुटवडा जाणवतो!
मागील दोन महिने ३०-४०% चं पाणीपुरवठा होत आहे
मुंबई : देशातील सर्वाधिक श्रीमंत लोक राहत असलेल्या मुंबईच्या कफ परेड भागात पाण्याची टंचाई निर्माण झालीय. रतन टाटा, अनिल अंबानी, सायरस मिस्त्री, बजाजसह अनेक उद्योगपतींच्या घरात गेल्या तीन दिवसांपासून पालिकेचे पाणी आलेच नाही. मुंबईतल्या सर्वात उच्चभ्रू, श्रीमंत वस्तीत कफ परेड, कुलाबा, फोर्ट या ठिकाणी गेले तीन दिवस पाणी नाही.
मागील दोन महिने ३०-४०% चं पाणीपुरवठा होत आहे. कुलाबा, कफ परेडमध्ये टँकरनं पाणी भरण्याची वेळ आलीय.
या भागात मोठ्या उद्योगपतींसह मोठे प्रशासकिय अधिकारी, बँकांचे अधिकारी यांच्याही रहिवासी इमारती इथेच आहेत. या ठिकाणीही महापालिकेच्या पाईपलाईननं पाणीपुरवठा होतो.
दरम्यान, टँकरमाफिया आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या संगनमतानं कृत्रीम पाणीटंचाई निर्माण केली जात असल्याचा आरोप स्थानिक नगरसेवक मकरंद नार्वेकरांनी केलाय.