मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील सर्वांचे आकर्षणाचे केंद्र आणि दुर्मिळ असणाऱ्या पांढऱ्या वाघाचा आज मृत्यू झाला. या पांढऱ्या वाघाला 'बाजीराव' या नावाने ओळखले जात होते. या वाघाचा वयाच्या १८ व्या वर्षी मृत्यू झाला. बाजीराव हा बोरीवलीमधील नॅशनल पार्कमधील सर्वात वृद्ध वाघ होता. त्याच्या मृत्यूनंतर अनेक वन्यप्रेमींमध्ये दु:ख व्यक्त केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुर्मिळ वाघापैकी एक हा पांढरा वाघ होता. त्याच्या मृत्यू झाल्याने संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील महत्वाचा प्राणी कमी झाला आहे. वयोमानामुळे बाजीरावचे निधन झाल्याचे सांगण्यात येत आहे. या वाघाचे शववविच्छेदन करण्यात येणार असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.


२००१मध्ये त्याचा जन्म झाला होता. गेल्या चार वर्षांपासून तो संधीवात आणि स्नायुदुखीमुळे त्रस्त होता. त्यामुळे तो जायबंदी झाला होता. गेल्या दहा दिवसांपासून त्याला चालता येत नव्हते. त्याच्यावर उपचार सुरु होते. मात्र, या उपचारांनी त्याला आराम मिळाला नाही. आज या दुर्मिळ वाघाचा आजारामुळे मृत्यू झाला.