मोठा राजन असा संपला, आणि छोटा राजन पुढे आला
मोठ्या राजनला तरी काय माहित होतं की, अशाच टाईपराटरटने त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी टक-टक-टक करत कोर्टात लिहिली जाणार आहे.
मुंबई : एक प्रत्येक अध्याय तेव्हा सुरू होतो, जेव्हा पहिला संपतो, छोटा राजनची कहाणी देखील तशीच आहे, जेव्हा मोठा राजन म्हणजेच राजन नायरचा अंडर वर्ल्डमधला गुन्हेगारी पार्श्वभूमीचा अध्याय संपला, तेव्हा छोटा राजनचा सुरू झाला. राजन नायर म्हणजेच मोठा राजन हा टेलरिंग म्हणजे शिंपी काम करत होता. दिवसभरात तो २५ ते ३० रूपये कमावत होता. प्रेमात बुडालेल्या राजन नायरच्या गर्लफ्रेन्डचा बर्थडे आला, तेव्हा पैशांची तशी कमतरता होती. तेव्हा राजन नायरने टाईपराटरची पहिली चोरी केली, मोठ्या राजनला तरी काय माहित होतं की, अशाच टाईपराटरटने त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी टक-टक-टक करत कोर्टात लिहिली जाणार आहे.
राजनच्या गर्लफ्रेन्डच्या गरजा पुढे अशा पैशातून पूर्ण होवू लागल्या. चोऱ्यांच्या तसेच वेगवेगळ्या आरोपात राजन नायरला अटक झाली, आणि त्याला ३ वर्षांची शिक्षा झाली, राजन नायर ३ वर्ष जेलमध्ये खंगत होता, पण त्याच्या डोक्यात अजूनही चुकीच्या वाटांवर जाणं सुरूच होतं.
मोठा राजन, गर्लफ्रेन्ड, आणि अब्दुल कुंजू
राजन नायर म्हणजेच मोठा राजन, जेलमधून बाहेर पडला तेव्हा, त्याने 'गोल्डन गँग' बनवली, पुढे त्याचे कारनामे वाढत गेले. राजनच्या गँगमध्ये पहिला गुंड सामिल झाला, अब्दुल कुंजू. मात्र अब्दूल कुंजूने काही दिवसात राजन नायरच्या गर्लफ्रेन्डसोबत लग्न केलं आणि राजन नायर आणि अब्दूल कुंजू यांच्यात शत्रुत्वाला सुरूवात झाली. स्थानिक न्यूज पेपरनुसार १९८२ मध्ये पठाण बंधूंनी अब्दुल कुंजूच्या मदतीने न्यायालयाबाहेर मोठा राजन म्हणजेच राजन महादेव नायरची हत्या केली.
राजन नायर हा अंडरवर्ल्डच्या जगातला 'मोठा राजन' म्हणून ओळखला जात होता, 'मोठा राजन'चं अस्तित्व संपल्यानंतर 'छोटा राजन'ला मोठी संधी मिळाली. छोटा राजनचं नाव पुढे येऊ लागलं. मात्र छोटा राजनला मोठ्या राजनविषयी नितांत आपुलकी होती, यानंतर चौकशी एजन्सींना छोटा राजन आणि दाऊद यांच्यात मैत्री झाल्याची खबर लागली होती.
यानंतर काय झालं हे, खालील क्रमाने वाचा
२) छोटा राजनच्या नावाची दहशत सुरू झाली या घटनेवरून...
३) दाऊद-छोटा राजनची पहिली भेट, मोठा राजनच्या हत्येचा बदला
४) छोटा राजन आणि दाऊदच्या मैत्रीत असं काही झालं....
५) छोटा राजन आणि दाऊदची 'ही दोस्ती तुटायची नाय'...पण
६) दाऊदला छोटा राजनविषयी वाईट बोललेलं आवडतं नव्हतं...!
७) छोटा राजनला फोन, "नाना वो तुमको टपकाने का प्लानिंग किएला है"
८) छोटा राजनला अखेर पत्रकाराची हत्या महागात पडली
आणि पुन्हा क्रमांक १ खाली
१) मोठा राजनच्या हत्येनंतर छोटा राजन पुढे आला...