मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज विधानभवनात मनसुख हिरेन (Mansukh Hiren Death Case) प्रकरणावरून राज्य सरकारला घेरलं. मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील धक्कादायक माहिती त्यांनी समोर आणली. मनसुख हिरेन हे शेवटचे धनंजय गावडेंना (Dhananjay Gawade)  भेटले होते. त्यांच्या भेटीच्या ठिकाणापासून ४० किमीवर मनसुख हिरेन यांची बॉडी सापडली, अशी धक्कादायक माहिती देवेंद्र फडणवीसांनी समोर आणली. 


फडणवीस गावडेंबद्दल काय म्हणाले?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 मनसुख हिरेन यांच्या फोनचे शेवटचं लोकेशन धनंजय विठ्ठल गावडे यांच्या ठिकाणी आहे. ४० किलोमीटर दूर बॉडी सापडते. गावडेच्या ठिकाणी जाण्याचे कारण काय, गावडेच्या इथे शेवटचे लोकशन आहे. त्यानंतर ४० किलोमीटर बॉडी सापडली आहे. हे अगदी स्पष्ट आहे. यापेक्षा अजून पुरावे काय हवे आहेत.(मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप; विधिमंडळात गोंधळ)


 


फडणवीसांनी उल्लेख केलेले धनंजय गावडे? 


धनंजय गावडे हे वसई-विरार महापालिकेतील शिवसेनेचे नालापासोपारा येथील माजी नगरसेवक. गावडे हे पालिकेतील गटनेता, स्थायी समिती सदस्य आणि शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुखही होते. २०१५ साली धनंजय गावडे शिवसेनेच्या तिकिटावरून नगरसेवक पदासाठी निवडून आले. त्यानंतर त्यांच्यावर बनावट कागपत्रांच्या सहाय्याने जमीन हडपल्याचा त्यांच्यावर आरोप केला. यामुळे २०१७ साली शिवसेनेतून त्यांची हकालपट्टी करण्यात आली. 


२०१६ मध्ये आयकर विभाग आणि ईडीने त्यांच्या घरी छापे मारले होते. त्यावेळी त्यांच्याकडून 40 लाख रुपयांच्या नोटा जप्त केल्या होत्या. ही रक्कम ईडीला गावडे यांच्या गाडीत मिळाली होती.


२०१८ साली एका ३४ वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्याआधी त्यांच्यावर इतरही गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. काही बिल्डरांनी त्यांच्यावर ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप केला होता.