मुंबई : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) शनिवारी मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या क्रूझवर छापा टाकला आणि ड्रग्ज जप्त केली. या प्रकरणात एनसीबीने बॉलिवूड स्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह (Aryan Khan) 8 जणांची चौकशी केली. त्यानंतर तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एनसीबी मुंबईचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना मिळालेल्य़ा माहितीच्या आधारे प्रवासी म्हणून क्रूझवर आले होते. त्याच्यासोबत एनसीबीचे इतर अनेक अधिकारी उपस्थित होते. क्रूझवर पार्टी सुरू होताच NCB च्या टीमने छापा टाकला आणि तेथून 8 लोकांना ताब्यात घेतले. तपासादरम्यान एनसीबीने ड्रग्ज (Drugs) जप्त केली आहेत.


गेल्या वर्षी, जेव्हा सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलीवूडमध्ये ड्रग्स अँगल समोर आले होते, तेव्हाही समीर वानखेडे यांचे नाव प्रसिद्धीच्या झोतात आले होते. समीर वानखेडे यांना 'सिंघम' म्हटले जाते आणि असे मानले जाते की बॉलिवूड सेलिब्रिटी देखील त्यांना घाबरतात.


कोण आहेत समीर वानखेडे?


मूळचे महाराष्ट्रातील असणारे समीर वानखेडे 2008 च्या बॅचचे IRS अधिकारी आहेत. भारतीय महसूल सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईच्या छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उप सीमा शुल्क आयुक्त म्हणून होती. त्यांच्या क्षमतेमुळे त्यांना नंतर आंध्र प्रदेश आणि नंतर दिल्लीला पाठवण्यात आले. ते ड्रग्ज संबंधित बाबींमध्ये तज्ञ मानले जातात.


हे पण वाचा: Drugs Case: आर्यन खानच्या आधी ड्रग्ज प्रकरणात आलीये या बॉलीवूड सेलिब्रिटींची नावे


गेल्या दोन वर्षांत समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली सुमारे 17,000 कोटी रुपयांचे ड्रग्ज आणि ड्रग्स रॅकेट उघडकीस आले. गेल्या वर्षीच समीर वानखेडे यांची डीआरआयमधून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडे बदली झाली होती.


समीर वानखेडेची सेलिब्रिटींशी टक्कर


समीर वानखेडे हे आपल्या कर्तव्याप्रती अत्यंत प्रामाणिक आहेत आणि जेव्हा कर्तव्याचा प्रश्न येतो तेव्हा समोर कोण आहे याची त्यांना पर्वा नसते.


कोणताही प्रवासी परदेशातून 35 हजार रुपयांपर्यंत माल आणू शकतो, परंतु त्यापेक्षा जास्त किमतीच्या वस्तूंच्या बाबतीत 36% सीमाशुल्क भरावा लागतो. मालाची किंमत 5 लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास कस्टम अधिकारी त्याला अटक करू शकतो.


वानखेडे फक्त दोन सेलिब्रिटींनाच मानतात. पहिला व्यक्ती म्हणजे अजय देवगण आहे, कारण त्याने कधीही कर भरण्यास नकार दिला नाही आणि दुसरी व्यक्ती म्हणजे मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर आहे, जी त्यांची पत्नी आहे. समीर वानखेडे आणि क्रांती (Kranti Redkar) यांचे 2017 मध्ये लग्न झाले आहे.


पाहा समीर वानखेडे यांची विशेष मुलाखत