सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : पत्राचाळ पुनर्विकास घोटाळ्याप्रकरणी (patra chawl scam) शिवसेना नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना ईडीने अटक केली होती. बुधवारी तब्बल 102 दिवसानंतर संजय राऊत जेलमधून बाहरे आले. विशेष न्यायालयाने (PMLA Court) बुधवारी संजय राऊत यांना जामीन मंजूर केला. संजय राऊत यांचे 103 दिवस वाया गेले याला जबाबदार कोण? असा सवाल राष्ट्रवादी खासदार  सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांनी उपस्थित केला आहे. 
संजय राऊत यांच्या कुटुंबातील लोकांचे ते 103 दिवस कसे गेले असतील.  सगळं दडपशाहीने होत नसतं माझ्या शुभेच्छा आहेत सत्ताधाऱ्यांना असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी राऊत यांच्या अटकेवरुन टोला लगावला. 


जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधाला पाठिंबा 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

छत्रपती विरोधी सिनेमा आहे. इतिहासकार यांना बसवूया. याचं राजकारण करायचे नाही. मात्र, गलत है वो गलत है. छत्रपती विरोधी सिनेने खपवुन घेतले जाणार नाहीत असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या विरोधाचे समर्थम केले आहे. 


पक्ष वाढीसाठी भाजप प्रयत्न करत आहे. बारामती मध्ये स्वागत आहे. जे येणार ते पक्ष वाढीसाठी प्रयत्न करतात असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. भारत यात्रा जोरदार सुरू आहे. राहुल गांधी यांना खूप प्रेम अपेक्षा जास्त आहेत. लोकांच्या फार अपेक्षा जास्त आहेत.
भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांना जादू टोणा वरुन टोला


भाजप प्रदेशाध्यक्ष अंधश्रद्धावर बोलतात. ज्यामध्ये नरेंद्र दाभोळकर यांना जीव गमवावा लागतो. आपल्या वडिलांच्या वयाच्या लोकांना असं बोलले जातंय हे त्यांची संस्कृती आहे असा टोला सुप्रिया सुळे यांनी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांना लगावला. राष्ट्रवादीने उद्धव ठाकरेंवर जादू टोणा केला असं वक्तव्य बानवकुळे यांनी केले होते. 


निवडणुकीसाठी राजकिय पक्ष तयार असतात


मध्यावधी लागू ही शकतात. निवडणुकीसाठी राजकिय पक्ष तयार असतात. सत्तेत असणारे लोक आरोप आणि करण्यात कार्यक्रम करण्यात व्यस्त आहेत असं देखील सुप्रिया सुळे म्हणाल्या.