अर्णब यांच्यावर कारवाई करणारे `एन्काउंटर स्पेशालिस्ट` सचिन वाझे कोण आहेत?
जाणून घ्या सचिन वाझे यांच्याबद्दल
मुंबई : रिपब्लिक वाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना २०१८ मधील घडलेल्या प्रकरणाबाबत अटक करण्यात आलं. या अटकेमुळे सोशल मीडियावर भरपूर चर्चा झाली. अर्णब गोस्वामी यांच्यासोबतच आणखी एका व्यक्तीची जोरदार चर्चा होतेय ती व्यक्ती म्हणजे सचिन वाझे.
अर्णब गोस्वामी यांच्या अटकेचा जो व्हिडिओ व्हायरल झाला त्यात आपण सचिन वाझे यांचा नावाचा उल्लेख ऐकलाच असेल. सचिन वाझे हे मुळचे कोल्हापूरचे. सचिन हिंदुराव वाझे असं यांच पूर्ण नाव. सचिन यांचा जन्म २२ फेब्रवारी १९७२ चा. १९९० साली त्यांनी पोलीस सेवेत पोलीस उप - निरीक्षक पदापासून सुरवात केली. नक्षल प्रभावी भागात त्यांना पहिलीच पोस्टिंग मिळाली होती. त्यामुळे त्यांची खऱ्या अर्थाने ट्रेनिंग गडचिरोली जिल्ह्यातच झाली.
कामाच्या कौशल्यामुळे १९९२ साली म्हणजे अवघ्या दोन वर्षातच त्यांना ठाण्यात पाठवण्यात आले. नक्षलग्रस्थ भागात काम केल्यामुळे त्यांच्या मनात कुठल्याच भीतीचा मागमूस उरला नव्हता.
मुंबईतल्या हिंदू - मुस्लीम संवेदनशील भागात सामाजिक सलोखा प्रस्थापित करण्यात देखील सचिन वाझे यांनी मोलाचे योगदान दिले. त्यामुळे आपसूकच या कामातून बढती मिळाली आणि पोलीस खात्यात असलेली पत देखील वाढली.
३0 वर्षांच्या पोलीस करिअरमध्ये त्यांनी 'एन्काऊंटर स्पेशालिस्ट' ऑफिसर म्हणून नाव कमावलं. ६९ अट्टल गुन्हेगारांना सचिन वाझे यांनी यमसदनी पाठवलं. यातील एक नाव म्हणजे मुन्ना नेपाली. मुन्ना नेपालीच्या एन्काऊंटरमुळे सचिन वाझे यांना लोकप्रियता मिळाली.
जशी प्रसिद्धी मिळाली तशी काही प्रकरणात बदनामी देखील झाली.२००२ साली घाटकोपर बॉम्ब ब्लास्ट केसचा प्रमुख आरोपी मोहम्मद युनुस याच्या कथित हत्तेप्रकरणी वाझे यांना सस्पेंड देखील करण्यात आले होते.त्यानंतर २००७ साली वाझे यांनीच राजीनामा दिला होता.पण जून २०२० साली मुंबई पोलिसांत अधिकारी वर्गाची कमतरता असल्यामुळे त्यांना पुन्हा सेवेत घेण्यात आले.
वाझे यांचा सायबर गुन्हे प्रकरणात खूप मोठा अभ्यास आहे. तसेच त्यांनी काही पुस्तके देखील लिहिले आहेत.त्यात 'जिंकून हरलेली लढाई', द स्कॉट,शीणा बोरा ; द मर्डर दँट शुक इंडिया, आदी पुस्तकांचा समावेश आहे.तसेच वाझे हे अनेक दैनिक आणि मासिकांत सातत्याने लिहित असतात, असे हे दमदार पोलीस अधिकारी सचिन हिंदुराव वाझे.