NCP Sharad Pawar: मंत्रिमंडळाच्या सदस्यांची बैठक होत असते. त्यांचा आताच्या मिटिंगचा काय विषय झालाय याचा तपशील माझ्याकडे नाही, असे शरद पवार म्हणाले. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी द्यावी अशी सूचना  अजित पवार यांनी केली होती. त्यानंतर आता अजित पवार समर्थकांकडून दबावतंत्राचा वापर करण्यात येत आहे. यावर शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रवादीत सध्या दोन गट पाहायला मिळतायत. प्रदेशाध्यक्ष पदासाठी एका गटाचा जयंत पाटील यांना तर दुसऱ्या गटाचा अजित पवारांना पाठिंबा आहे. यावर नव्या नेतृत्वाला संधी द्यावी असा पक्षात विचार असल्याचे शरद पवार म्हणाले. 


विरोधी पक्षनेताऐवजी प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी द्यावी अशी सूचना अजित पवार यांनी पक्षाच्या मिटींगमध्ये केली होती. प्रत्येकाला अशी सूचना मांडण्याचा अधिकार आहे. त्यामुळे 6 जुलैला होणाऱ्या पक्षाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे पवार म्हणाले. मी एकटा याबाबत निर्णय घेणार नाही. सर्वजण मिळून याबद्दल निर्णय घेऊ असेही ते म्हणाले. 


सर्व नेत्यांसोबत बैठक घेऊन पक्षांतर्गत मुद्द्यांवर तोडगा काढणार असल्याचे पवार यावेळी म्हणाले.