मुंबई : निर्माता दिग्दर्शक करण जोहरने (Karan Johar Party) आयोजित केलेल्या पार्टीत अभिनेत्री करीना कपूर (Karina Kapoor) आणि अभिनेत्री अमृता अरोरा ( Amrita Arora) यांना कोरोनाची लागण (Corona Virus) झाली. त्यानंतर अभिनेता संजय कपूरची पत्नी महीप कपूर (Maheep Kapoor) आणि अभिनेता सोहेल खान याची पत्नी सीमा खान (Seema Khan) यांचे कोरोना अहवालही पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे या पार्टीवरुन मोठा वाद निर्माण झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनीही या पार्टीवरुन महाविकास आघाडी सरकारवर (Mavikas Aghadi Government) गंभीर टीका केली आहे. या पार्टीत राज्य सरकारमधील एक मंत्री सहभागी झाले होते, असा आरोप आशिष शेलार यांनी केला आहे. त्या पार्टीत कोण मंत्री होता का? ते सीसीटीव्ही पाहून स्पष्ट करावं, मी मंत्र्याचं नाव घेत नाहीय, पण मी मागावर आहे, पालिकेने स्पष्टीकरण द्यावं असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.


पार्टीला जाण्यावर आपला आक्षेप नाही, पण पार्टीत सहभागी झालेल्या नावांची पालिका अधिकाऱ्यांना लपवाछपवी केली आहे, असा आरोपही शेलार यांनी केला आहे. तसंच या इमारतीचं सीसीटीव्ही फुटेज प्रसिद्ध करण्याची मागणीही शेलार यांनी केली आहे. या पार्टीत किती लोक सहभागी झाले होते, त्यांची कोरोना टेस्ट झाली का? असे सावर आशिष शेलार यांनी उपस्थित केले आहेत.



मुंबई महापालिका प्रशासनाचं स्पष्टीकरण
आशिष शेलार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर मुंबई महापालिकेने स्पष्टीकरण दिलं आहे. बाधित रुग्णाचा संपर्क असलेल्या इमारतीचे सीसीटीव्ही तपासणं हे मुंबई महापालिकेच्या कोविड नियमावलीत बसत नाही. बाधित रुग्णांचा वावर ज्या ठिकाणी झाला आहे त्या ३ इमारतींमध्ये कोविड टेस्टींग कॅम्प भरवून एकूण ११० जणांच्या कोविड टेस्ट करणअयात आल्या आहेत, या सर्व टेस्ट निगेटीव्ह आल्या आहेत.


करणी जोहरच्या इमारतीतील एकूण ५४ टेस्ट निगेटीव्ह आल्या आहेत. करण जोहर आणि बाधित रुग्णानी दिलेल्या माहितीवरुन केलेल्या कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंगनुसार ८ जण या पार्टीत होते. त्यांच्या निकट संपर्कातील सर्वांच्या टेस्ट करण्यात आल्या आहेत. 


यापर्टीत कोणता मंत्री, राजकीय व्यक्ती होती का याबाबत अद्यापही कोणती माहिती बाधित व्यक्ती किंवा त्यांच्या संपर्कातील लोकांकडून देणअयात आलेली नाही, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेने दिली आहे.