मुंबई : 'पंजाब नॅशनल बँक' घोटाळ्यात नीरव मोदीनं बँकांना २० हजार कोटींचा गंडा घातला आहे. मात्र अजूनही अर्थमंत्री गप्प का? असा प्रश्न काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी विचारलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशातल्या एवढ्या मोठ्या घटनेवर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली काहीच बोलत नसल्याबद्दल, पृथ्वीराज चव्हाण यांनी अरुण जेटलींवर जोरदार टीका केलीय.


नीरव मोदीला कसं पकडून आणणार? त्याच्याकडून पैसे कसे वसूल करणार? हे केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सांगायला हवं... मात्र ज्यांच्या खात्याचा हा विषय आहे ते केंद्रीय अर्थमंत्री काहीच बोलत नसून, इतर केंद्रीय मंत्रीच पुढे येऊन खुलासे करत असल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाणांनी केला.


यामुळे बँकिंग व्यवस्थेवरून लोकांचा विश्वास उडत चालल्याचंही त्यानी म्हटलंय.