मुंबई : महाराष्ट्रात महाआघाडीच्या सरकारचा शपथविधी सोहळा संध्याकाळी 6 वाजता शिवाजी पार्कवर होणार आहे. ज्यामध्ये उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. महाविकासआघाडीकडून आज उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाची आणि तिन्ही पक्षांचे २ असे एकूण सहा जण शपथ घेणार आहेत. शिवसेनेकडून सुभाष देसाई आणि एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून जयंत पाटील उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासोबत छगन भुजबळ शपथ घेणार आहेत. काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांचं नाव चर्चेत होतं. पण आता त्यांचं नाव यातून वगळण्यात आल्याचं कळतं आहे..


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाआघाडीच्या शपथविधी सोहळ्याआधी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांना मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसने अशोक चव्हाण यांच्या जागी नागपूरचे आमदार नितीन राऊत यांनी मंत्री बनवण्याचा निर्णय़ घेतला आहे. आदर्श घोटाळ्याची चौकशी सुरु झाल्यामुळे अशोक चव्हाण यांचं नाव वगळण्यात आल्याचं कळतं आहे. या प्रकरणात ईडीने पुन्हा एकदा चौकशी सुरु केली आहे. पण काँग्रेस नेत्यांनी याला नकार दिला आहे. नितीन राऊत यांना मंत्रीपद देणं हे सोशल इंजिनिअरिंगचा भाग असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. नितीन राऊत यांच्या माध्यमातून हे दलितांचं सरकार आहे असा संदेश काँग्रेसाल जनतेला द्यायचा आहे. असं काँग्रेस नेत्यांचं म्हणणं आहे.


महाविकासआघाडीच्या खातेवाटपात काँग्रेसच्या वाट्याला जागा एक जादा कॅबिनेटमंत्रीपद येणार आहे. उपमुख्यमंत्रीपदाऐवजी एक कॅबिनेट मंत्रीपद वाढलंय. फॉर्म्युल्यानुसार शिवसेनेला ११ कॅबिनेटपदं आणि ५ राज्यमंत्रिपदं अशी १६ मंत्रिपदं. राष्ट्रवादीला ११ कॅबिनेट आणि ४ राज्यमंत्रीपदं अशी एकूण १५ मंत्रिपदं तर काँग्रेसला १० कॅबिनेट आणि ३ राज्यमंत्रिपदं मिळणार आहेत. आधी काँग्रेसच्या वाट्याला ९ कॅबिनेटपदं मिळणार होती. उपमुख्यमंत्रीपदाऐवजी एक कॅबिनेट मंत्रीपद वाढलं आहे.