मुंबई : राफेलवरुन पुन्हा गोंधळ सुरू झाला आहे. पण या राफेलचा विमानांशी काहीही संबंध नाही. तर राफेल नावाच्या एका मुंबईतल्या मुलाला भलतेच प्रश्न पडले आहेत. आई वडिलांनी मला न विचारताच का जन्माला घातले, असा त्याने सवाल उपस्थित केला आहे. त्यासाठी त्याने आई-वडिलांच्या विरोधात चक्क न्यायालयात धाव घेतली आहे. राफेल नावाचा एक मुलगा एक विचित्र याचिका दाखल केली आहे. मला न विचारताच आई वडिलांनी जन्माला का घातलं ? मी दुःख का म्हणून भोगू ?आई-वडिलांच्या आनंदासाठी माझा जन्म का, असे प्रश्न राफेलला पडले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे सगळे प्रश्न उपस्थित करत त्यासाठी चक्क न्यायालयात धाव घेतली. मालमत्तेसाठी आई-वडिलांविरोधात न्यायालयात मुले जातात. पण २७ वर्षांचा राफेल सॅम्युअल मला जन्माला का घातले, असे म्हणत आई-वडिलांच्या विरोधात न्यायालयात गेला आहे. 


राफेल त्याच्या फेसबुक पोस्टमध्ये लिहितो....


मी का म्हणून दु:ख भोगू?, 
मी का म्हणून काम करावे?, कारण, कुणी तरी मला आपल्या उद्देशासाठी जन्माला घातले आहे.' वंशवृद्धी करणं ही जगातली टोकाची आत्मपूजा... जे जग दु:खाने भरलेले आहे, अशा जगात मुलाला जन्म देणे गैर आहे. 


राफेलला आईचे उत्तर


आता सॅम्युअएलने त्याची ही फेसबुक पोस्ट डिलीट केली आहे. पण सॅम्युअलच्या आईने मुलाच्या या पोस्टला उत्तर देणारी एक पोस्ट टाकली आहे. त्यात ती म्हणते. राफेलला जन्म देण्यापूर्वी मी त्याची परवानगी कशी काय घेऊ शकते, हे जर तो न्यायालयात सिद्ध करू शकला. तर मी माझी चूक मान्य करेन. 


यानिमित्ताने एक इतिहासातले भांडण आठवले. एकदा महानायक अमिताभ बच्चनही असेच नाराज झाले आणि त्यांनीही हरिवंशराय यांना उद्वेगाने विचारलं होते की मला जन्माला का घातले.... ? त्यावेळी हरिवंश राय बच्चन म्हणतात. 


जिंदगी और जमाने की कशमकश से घबराकर, 
मेरे बेटे मुझसे पूछते हैं कि हमें पैदा क्यों किया था?
और मेरे पास इसके सिवाय कोई जवाब नहीं है कि, मेरे बाप ने मुझसे बिना पूछे मुझे क्यों पैदा किया था? 
और उनके बाप ने बिना पूछे उन्हें पैदा किया था?
जिंदगी और जमाने की कशमकश पहले भी थी, 
आज भी है शायद ज्यादा कल भी होगी, 
शायद और ज्यादा…
तुम ही नई लीक रखना, अपने बेटों से पूछकर उन्हें पैदा करना.