मुंबई : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pedankar) यांना जीवे मारण्याच्या धमकीचं पत्र आल्याने आल्याने खळबळ उडाली आहे.  गेल्यावर्षी जून महिन्यात फोनवरुन किशोरी पेडणेकर यांना धमकी देण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा निनावी पत्र थेट महापौर बंगल्यात आलं आहे. या पत्रात अश्लिल भाषेचा वापर करण्यात आला असून महापौरांना शिविगाळ देखील करण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषद याबाबतची माहिती दिली. या पत्रातील भाषा इतकी अश्लील आहे, कुटुंबातील लोकांना गोळ्या घालून मारुन टाकण्याची धमकी देण्यात आली आहे, हे सांगताना महापौर व्यथित झाल्या आणि भर पत्रकार परिषदेत महापौरांच्या डोळ्यात तरळले.


महापौर काय म्हणाल्या
वयाची साठी ओलांडत असताना अशा प्रकारे विकृत भावनेने पत्र पाठवलं, निश्चितच ते परिणामकारक आहे. ज्या पद्धतीने लिहिलं गेलंय, कुटुंबातील प्रत्येकाला मारून टाकू, त्यांना गोळ्या घालू, या अवयवांची विटंबना करु, जेव्हा अशा पद्धतीने येतं, तेव्हा कोणतीही स्त्री जरी वयाने झाली तरी लज्जा मरेपर्यंत असते. मेल्यानंतरही स्त्रीला जेव्हा आंघोळ घालतो तेव्हाही स्त्रीसूलभ लज्जा राखतो, असं महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं.


राजकीय आरोपांची पातळी खाली-खाली चालली आहे. याआधी आरोप पक्षांवर होत होते. महिला महापौर असूनही जे काही शब्दप्रयोग होते ते नक्कीच मला स्वत:ला क्लेषदायक आहेत.  विजेंद्र म्हात्रे नावाच्या व्यक्तीचा या पत्रात उल्लेख आहे, त्यात उरणचा पत्ता आहे, अॅडव्होकेट आहे. शिक्का मात्र पनवेलचा आहे. कन्फ्यूज करणारा पत्ता आहे, पण त्यातली भाषा मात्र कन्फ्यूज करणारी नाहीए, असं महापौरांनी म्हटलं आहे.


हीन दर्जाची भाषा मुद्दाम वापरली गेली आहे. शिवसेनेच्या महिला कशा आहेत हे प्रत्येक पक्षाला माहित आहे. अशा प्रकारची भाषा वापरुन कुठेतरी कटकारस्थान करण्याच प्रयत्न करत असेल तर निश्चित माझं काही झालं तरी चालेल, पण माझ्या कुटुंबाला धक्का लावण्याचा कुणी प्रयत्न केला तर सहन करणार नाही, माझ्यासाठी माझा पक्ष आणि कुटुंब प्रथम आहे.


असल्या गोष्टीला मी भीक घालत नाही, मुंबई पोलिसांवर माझा विश्वास आहे. कारण नसताना मुंबईची महाराष्ट्राची बदनामी करण्याचा हा जो काही डाव आहे. शिवेसेनाला बदमान करणं, शिवसेनेच्या महिलांना बदनाम करणअयाचा डाव आहे याचा तीव्र शब्दात निषेध करते, असं महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.