मुंबई : शिवसेनेचा घाटकोप येथील अंतर्गत वाद शिगेला पोहोचला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बाहेरून राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना पक्षात प्राधान्य दिल्यामुळे शिवसैनिक नाराज झाले आहे. राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना पक्षात घेण्यापेक्षा राज ठाकरेंनाच शिवसेनेत का घेत नाही? असा थेट सवाल नाराज शिवसैनिकांनी विचारला आहे.


 ईशान्य मुंबईची 'नवनिर्माण शिवसेना' असं नाव देत नाराज शिवसैनिकांनी बॅनरबाजी केली. ही बॅनरबाजी घाटकोपरमध्ये करण्यात आली आहे. नाराज शिवसैनिकांनी बॅनकमधून एक सवाल केला आहे की, कार्यकर्त्यांना घेण्यापेक्षा राज ठाकरेंनाच का पक्षात घेत नाही?  'शिवसेनेला निष्ठावंतांची गरज नाही, चार घरं फिरुन आलेल्या लोकांची पक्षाला गरज आहे, असं म्हणत शिवसैनिक आक्रमक झाले.


काय लिहिलंय पोस्टरवर?


ईशान्य मुंबई विभाग प्रमुख मा. श्री. राजेंद्र राऊत साहेब यांच्या धोरणानुसार ईशान्य मुंबई विभाग क्र. 8 च्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची उपविभाग प्रमुख, विधानसभा संघटक, सहसंघटक व शाखाप्रमुख यांची यादी नुकतीच जाहीर झाली. त्याचवेळी लक्षात आले की, यातील नियुक्त्या करण्यात आलेले बरेच जण अनेक पक्ष फिरुन संघटनेच्या विरोधात निवडणूक लढवून किंवा विरोधात काम करणाऱ्यांना मा. विभाग प्रमुखांनी संघटनेची सन्मानाची पदे बहाल केली आहेत. याचा अर्थ असा होतो की सध्या शिवसेनेत या पदांच्या लायकीचा निष्ठावंत शिवसैनिक या पदाच्या लायकीचे नाही. त्यामुळे मा. राज ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसून आलेल्या लोकांना महत्त्वाचे पदे बहाल करण्यात आली. त्या ऐवजी मा. राज ठाकरेंनाच शिवसेनेत का घेत नाही?