COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : रेल्वे आर्थिक संकटात असल्याचं कारण सांगत रेल्वे बोर्डानं परळचा कारखाना बंद करून तो नागपूरला हलवण्याचा घाट घातलाय. या जागेवर टर्मिनस उभारण्याचं निमित्त बोर्डाकडून पुढे करण्यात येत असलं तरी कारखाना नागपुरला का हलवला जातोय. असा सवाल या कारखान्यातले कामगार करतायत. रेल्वेच्या बोर्डाच्या या निर्णयाला रेल्वेच्या कर्मचार्‍यांनी जोरदार विरोध केला आहे.


संघटनांचा विरोध 


मुंबईत चार टर्मिनस असताना आणखी परळच्या टर्मिनसची आवश्यकता काय ? असा सवाल रेल्वे कर्मचारी संघटनेकडून उपस्थित केला जातोय. कारखाना कुठल्याही परिस्थितीत बंद करू देणार नाही अशी भूमिका आता रेल्वे संघटनांनी घेतलीय. त्यामुळे या मुद्द्यावरून रेल्वे कर्मचारी आणि रेल्वे प्रशासनात आगामी काळात संघर्ष होण्याची चिन्ह आहेत.