मुंबई : कोविड लसींमुळे देशाची मान उंचावणाऱ्या महाराष्ट्राला कमी पद्म पुरस्कार का? असा प्रश्न शिवसेनेने केंद्राला विचारलाय. जपानच्या शिंजो आबेंना पद्म पुरस्कार देण्यावरूनही जोरदार टीकास्त्र सोडण्यात आलंय. महाराष्ट्राला फक्त सहा  पद्म पुरस्कार मिळाले याचं आश्चर्य वाटतं. अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नावांच्या यादीवर बोट ठेवलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


कोविंड लसीमुळे देशाची मान उंचावली ती महाराष्ट्रात निर्माण झाली. प्रधानमंत्री केंद्र सरकार जे मान उंचावून चालत आहेत ते महाराष्ट्रामुळेच असेही ते म्हणाले.
 
महाराष्ट्रात किमान दहा ते बारा लोकांचा सन्मान व्हायला हवा होता, असं राऊत म्हणाले. जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांनाही पद्मपुरस्कार जाहीर झाल्यानं राऊत यांनी केंद्रावर निशाणा साधला. त्यांनी बुलेट ट्रेन दिल्याचा हा त्यांचा सन्मान असावा जी बुलेट ट्रेन महाराष्ट्राने नाकारली असा चिमटा देखील राऊत यांनी काढला.