हिमांशू रॉय यांनी आत्महत्या केली तेव्हा घरात कोण होतं?
माजी एटीएस प्रमुख हिमांशू रॉय यांनी आत्महत्या केली आहे.
मुंबई : माजी एटीएस प्रमुख हिमांशू रॉय यांनी आत्महत्या केली आहे. हिमांशू रॉय हे बोर्नमॅरो कॅन्सर या आजाराने ग्रस्त होते. हिमांशू रॉय यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. महाराष्ट्र पोलीस दलासाठी ही धक्कादायक बातमी आहे. हिमांशू रॉय यांनी अनेक हायप्रोफाईल केसेस धसास लावल्या होत्या. हिमांशू रॉय यांनी अनेक मोठ मोठे आणि गुंतागुंतीचे गुन्हे देखील बाहेर आणले. आयपीएल बेटिंग-ललीत मोदी प्रकरण, जेडे मर्डर केस हिमांशू रॉय यांनी उघड केली आहे. हिमांशू रॉय अनेक केसेस पर्सनली मॉनिटर करत होते. हिमांशू रॉय हे बॉडीबिल्डर ऑफिसर होते. शरीर यष्टीने अतिशय फिट असे हिमांशू रॉय होते, हिमांशू रॉय मागील एक दीड वर्षापासून मेडिकल लिव्हवर होते. हिमांशू रॉय आपल्या शेवटच्या काळात अतिशय विक होते, असंही सांगण्यात येत आहे.
तोंडात गोळी झाडून हिमांशू यांची आत्महत्या
हिंमाशू रॉय यांनी तोंडात गोळी झाडली, त्यांना तात्काळ उपचारासाठी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं, पण त्यांचा मृत्यू झाला होता. हिमांशू रॉय यांना कॅन्सर झाला होता. त्यांचा कॅन्सर बरा होत होता, पण त्यांना नैराश्याने ग्रासलं होतं, असंही त्याच्या काही जवळच्या लोकांनी सांगितलं होतं. हिमांशू रॉय हे हाय प्रोफाईल केसेस उघड करण्याच्या बाबतीत नावारूपास आले होते.
तेव्हा घरात कोण होतं?
हिमांशू रॉय यांनी बेडरुममध्ये खासगी रिव्हॉल्वरनं तोंडात गोळी झाडली. हिमांशू रॉय यांनी स्वत:वर गोळी झाडून घेतली तेव्हा घरात त्यांची पत्नी आणि नोकर होते. पत्नी आणि नोकरांनी त्यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये नेलं पण त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता.
हिमांशू रॉय यांची सुसाईड नोट
हिमांशू रॉय यांच्या आत्महत्येची सुसाईड नोट देखील मिळाली आहे. सुसाईड नोटमध्ये आपल्या मृत्यूसाठी कुणीही जबाबदार नसल्याचं त्यांनी लिहिलं असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी अधिकृत पत्राद्वारे दिली आहे. हिमांशू रॉय यांच्या बेडरूममध्ये ही नोट सापडली आहे. हिमांशू रॉय यांच्या मृत्यूनंतर अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत, पण मुंबई पोलिसांनी अधिकृत माहिती दिल्यानंतर, आता तर्कवितर्क निश्चितच बंद होणार आहेत.