मुंबई : मुंबई पोलिसांचे एक ट्विट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हे ट्विट वाइनबद्दल आहे. खरेतर, नुकतेच, महाराष्ट्र सरकारने नवीन वाईन धोरण मंजूर केले आहे. ज्या अंतर्गत सुपरमार्केट आणि किराणा दुकानांवर वाईन खरेदी आणि विक्री करता येईल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वाईनबाबत या नव्या धोरणाला भाजपने विरोध केला, तर शिवसेना नेते संजय राऊत यांनी या निर्णयाचे समर्थन केले आहे. भाजपवर टीका करताना शेतकऱ्यांच्या हितासाठी वाईनबाबत निर्णय घेतल्याचे राऊत यांनी सांगितले. वाईन म्हणजे दारू नाही. वाईनची विक्री वाढल्याने शेतकऱ्यांना फायदा होईल.


महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपला फक्त विरोध करता येतो. ते शेतकऱ्यांसाठी काम करीत नाही. असेही राऊत यांनी म्हटले.


ब्रेथ अॅनालायझरमध्ये अल्कोहोल आढळल्यास...


संजय राऊत यांच्या वक्तव्यानंतर शिवम वहिया नावाच्या युजरने ट्विटरवर मुंबई पोलिसांना गंमतीत टॅग करत म्हटले की,‘आता मी वाईन पिऊन गाडी चालवली तर तुम्ही मला जवळचा बार दाखवाल की, तुरूंगात टाकाल?


या व्यक्तीच्या प्रश्नाला उत्तर देताना मुंबई पोलिसांनी सांगितले की, "सर, आमची इच्छा आहे की, तुम्ही एका जबाबदार नागरिकाप्रमाणे मद्यपान करून गाडी चालवू नये. तसेच ब्रेथ अॅनालायझरमध्ये दारू आढळल्यास तुम्हाला आमच्या तुरूंगाचा पाहूंचार स्विकारावा लागेल''.



मुंबई पुलिसांच्या उत्तराची चर्चा


सोशल मीडियावर मुंबई पोलिसांच्या या उत्तराची चर्चा सुरू आहे. अनेक युजर्सने त्यांचे कौतुक केले आहे. पोलिसांचे हे ट्वीट अनेकजणांनी रिट्वीट केले आहे.