मुंबई : 'गेल्या 47 वर्षांत, माडिया गोंड म्हणजे आदिवासी समाजाकरता केलेलं कार्य हे डोळे उघडणारं आहे. आम्ही त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केलेच. पण त्यासोबतच त्यांच्याकडून साधेपणात आणि कोणतीही अपेक्षा न करता आयुष्य किती चांगल जगू शकतो, हे देखील शिकलो', असं सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रकाश बाबा आमटे यांनी सांगितलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनीलाईफ फाऊंडेशनच्या 10 व्या वर्धापन दिनानिमित मुंबईत एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला डॉ.प्रकाश आमटे आणि डॉ. मंदाकिनी आमटे देखील उपस्थित होते. यावेळी त्यांनी आदिवासी समाजातील लोकांच वेगळेपण अधोरेखित केलं. 


'ओडिसी समाजाची सेवा करताना आम्हाला समाजातील खूप चांगल प्रतिबिंब पाहायला मिळालं,' असं डॉ. प्रकाश आमटे सांगतात. पुढे ते म्हणाले की,'आमच्या सेवेतील दुसऱ्या रूग्णाला आम्ही बेड म्हणजे खाटेवर झोपवून उपचार केले. बरं झाल्यावर तो बेडच घेऊन गेला. त्याने आमचे आभार तर राहूनच द्या पण मागे वळून देखील पाहिलं नाही. पण त्यांची जीवनशैली अनुभल्यावर लक्षात आलं की, हा समाज एकमेकांसाठी खंबीरपणे उभा राहतो. जेव्हा कुणालाही गरज असते तेव्हा त्यांचा समाज त्यांच्यासोबत असतो. आम्ही त्यांच्याकडून खूप शिकतो. त्यामुळे कोणतंही काम करताना त्यामधून अपेक्षा ठेवत नसल्याचं यावेळी आमटे म्हणाले.'


'आदिवासी समाजात कधीच बलात्कार होत नाहीत'


गेल्या ४७ वर्षांपासून आम्ही आदिवासींकरता कार्य करत आहोत. यावर्षांत आम्ही एकही बलात्काराची घटना ऐकली नाही. आदिवासी उपाशी राहतील पण चोरी करणार नाहीत. जर एखाद्या व्यक्तीला कशाची गरज लागल्यास संपूर्ण समाज त्याच्या मदतीकरता धावून येतो. महत्वाचं म्हणजे, यांच्यांमध्ये सहिष्णुता आहे ज्याचा आपल्याला शहरी लोकांमध्ये अभाव पाहायला मिळतो.