मुंबई : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात एनसीबीच्या साक्षीदाराने केलेल्या वक्तव्यामुळे कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. ड्रग्ज प्रकरणात  शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला गोवण्यात आल्याचा दावा साक्षीदाराने केला आणि कारवाईची पूर्व योजना होती, असं देखील साक्षीदाराने सांगितलं आहे. त्यामुळे आता पुढे याप्रकरणी नक्की काय होणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, 3 ऑक्टोबर रोजी आर्यनला ड्रग्स प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यानंतर आर्यन तब्बल 25 दिवसांनंतर जामीन मंजूर झाला. मुंबई उच्च न्यायालयाने आर्यनचा अर्ज मंजूर केला.  या प्रकरणी रोज नवे खुलासे समोर येत आहेत. आता साक्षीदार विजय पगारेने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत क्रुझवर करण्यात आलेला छापा पूर्वनियोजित असल्याचा आरोप केला आहे.


यापूर्वी प्रकरणातील आणखी एक  साक्षीदार प्रभाकर साईलने आरोप केला होता की, एनसीबीच्या काही अधिकाऱ्यांनी आर्यनच्या सुटकेच्या बदल्यात पैसे उकळण्याचा प्रयत्न केला. महत्त्वाचं म्हणजे, मुंबई ड्रग्स प्रकरणात मोठी बातमी आली आहे. मुंबई ड्रग्स प्रकरणात तपास करणाऱ्या एनसीबीचे Zonal Director समीर वानखेडे यांना हाय प्रोफाईल आर्यन खान (Aryan Khan) प्रकरणातून हटवण्यात आलं आहे. 


आता मुंबई ड्रग्स प्रकरणाची चौकशी दिल्ली एनसीबीकडून केला जाईल. संजय सिंह हे या तपासकामाचे प्रमुख असतील. आर्यन खान प्रकरणासह वानखेडे यांच्याकडून सहा प्रकरणांच्या चौकशीचे अधिकार कडून काढण्यात आले आहेत.