महिला पुरुषाबरोबर हॉटेल रुममध्ये जात असेल तर त्याचा अर्थ S*x साठी...: मुंबई हायकोर्ट
Bombay HC On Woman Entering Hotel Room With Man: मुंबई हायकोर्टाच्या गोवा खंडपीठाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय दिला असून हॉटेलमध्ये महिलेने एखाद्या पुरुषाबरोबर जाण्यावरुन देण्यात आलेला निकाल रद्द केला आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे पाहूयात...
Bombay HC On Woman Entering Hotel Room With Man: मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने एका महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. उच्च न्यायालयाने एका प्रकरणाची सुनावणी करताना, एखाद्या महिलेने हॉटेलचा रुम बूक केला आणि ती एखाद्या पुरुषाबरोबर त्या रुममध्ये गेली तर याचा अर्थ तिची त्या पुरुषाबरोबर लैंगिक संबंध ठेवायला संमती आहे असा होत नाही असं म्हटलं आहे. स्री एखाद्या पुरुषाबरोबर हॉटेल रुममध्ये जात असल्याच तिची त्या पुरुषाबरोबर सेक्स करण्यासाठी संमती आहे असं म्हणता येणार नसल्याचं न्यायालयाने निकालामध्ये म्हणत आधीचा निकाल रद्द केला आहे.
तो निकाल केला रद्द
न्यायमूर्ती भरत पी. देशपांडे यांच्या एकल खंडपीठाने मार्च 2021 मध्ये मारगाव ट्रायल कोर्टाने दिलेली डिचार्ज ऑर्डर रद्द केली आहे. या ऑर्डरमुळे आरोपी गुलशेर अहमदविरुद्धचा बलात्काराचं प्रकरण कायमचं बंद करण्यात आलं होतं. ट्रायल कोर्टाने नोंदवलेल्या निरिक्षणामध्ये असं नमूद करण्यात आलं होतं की, जर रुम बूक करताना पीडित महिला सहभाग होता आणि ती आरोपीबरोबर या रुममध्ये शिरली होती. तिच्या या दोन्ही कृत्यांचा अर्थ तिने संमतीने शरीरसंबंध ठेवण्यास होकार दर्शवला होता, असं ट्रायल कोर्टाने निरिक्षण नोंदवताना म्हटलेलं. त्यामुळेच आरोपीविरुद्ध बलात्काराचा खटला चालवता येणार नाही, असं ट्रायल कोर्टाने मार्च 2021 च्या निकालात म्हटलं होतं.
एकत्र रुममध्ये जाणं म्हणजे...
"अशा प्रकारचा अंदाज बांधणे हे समोर असलेली परिस्थिती आणि घटना घडल्यानंतर तातडीने तक्रार दाखल करण्यात आल्याच्या वास्तूस्थितीशी भेद खाणारं आहे, असं उच्च न्यायालयाने 3 सप्टेंबर रोजी झालेल्या सुनावणीत म्हटलं असून याचा तपशील आताच जारी करण्यात आला आहे. "पीडित महिला आरोपीबरोबर रुममध्ये गेली याचा अर्थ तिचा लैंगिक संबंध ठेवण्यासाठी होकार आहे असा मुळीच घेता येणार नाही," असंही कोर्टाने म्हटलं.
नेमकं प्रकरण काय?
हा सारा प्रकार 2020 मध्ये सुरु झाला. पाडित तरुणीला आरोपीने परदेशात नोकरी देण्याच्या बहाणा केला. नोकरी देणाऱ्या एजन्सीच्या व्यक्तीशी भेट घालून देण्याचा बहाणा करुन ही व्यक्ती पीडितेला एका हॉटेल रुममध्ये घेऊन गेली. पोलिसांकडे केलेल्या तक्रारीनुसार आरोपी आणि पीडिता या दोघांनी मिळून हॉटेल रुम बूक केला. या रुममध्ये प्रवेश केल्यानंतर आरोपीने जीवे मारण्याची धमकी दिली आणि माझ्यावर बलात्कार केला असा या महिलेचा आरोप आहे.
..आणि तिने पळ काढला
आरोपी बाथरुमला गेला असताना आपण या खोलीतून पळून आल्याचं पीडितेने सांगितलं. त्यानंतर या महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली. या प्रकरणात पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करुन घेतला आहे.
आधी दोषमुक्त मग निकाल रद्द
ट्रायल कोर्टाने सदर महिला स्वइच्छेने हॉटेल रुममध्ये गेल्याचा दावा मान्य करत आरोपीला दोषमुक्त होतं होतं. हॉटेलच्या रुममध्ये पुरुषाबरोबर प्रवेश करणे म्हणजे शरीरसंबंध ठेवायला संमती देण्यासारखं असल्याचं ट्रायल कोर्टाचं म्हणणं होतं. मात्र आता तीन वर्षानंतर मुंबई उच्च न्यायालयाने ट्रायल कोर्टाचा निर्णय रद्द करत त्यावेळी निकालात चूक झाली होती असं म्हटलं आहे.