रेल्वे अधिकाऱ्यामुळे महिला थोडक्यात बचावली
चालती लोकल पकडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांची मुलगी ट्रेनमध्ये चढली.
नालासोपारा : देव तारी त्याला कोण मारी असं म्हटलं जातं. असाच काहीसा प्रकार नालासोपा-यात घडलाय. धावती लोकल पकडण्याच्या नादात प्लॅटफॉर्मवर फरफटत जाणारी महिला थोडक्यात बचावलीय. बोरीवलीला राहणा-या लता महेश्वरी या शुक्रवारी रात्री सव्वा नऊच्या सुमारास मुलीला घेऊन प्लॅटफॉर्मवर आल्या.
प्लॅटफॉर्म क्रमांक २ वरील चालती लोकल पकडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांची मुलगी ट्रेनमध्ये चढली. मात्र ट्रेन पकडताना लता महेश्वरी ट्रेनमधून पडल्या आणि फरफटत पुढे गेल्या. हा सगळा प्रकार रेल्वे अधिकाऱ्याने पाहिला.
धावत जाऊन त्यांनी या महिलेला बाहेर काढलं. त्यामुळेच ही महिला थोडक्यात बचावली,. काही वेळ उशीर झाला असता तर प्लॅटफॉर्म आणि फूटबोर्डमध्ये सापडून महिलेचा जीव गेला असता.