नऊवारी साडी घालून महिलांची सायकल-सवारी!
मुंबईमध्ये अनोख्या सायकल मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. या मॅरेथॉनमध्ये महिलांनी चक्क नऊवारी नेसून सायकल चालवली.
मुंबई : मुंबईमध्ये अनोख्या सायकल मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. या मॅरेथॉनमध्ये महिलांनी चक्क नऊवारी नेसून सायकल चालवली.
आपल्या आरोग्यासाठी आणि नियमित व्यायामासाठी सायकल चालवणं हा एक उत्तम व्यायाम आहे. असं असलं तरी सायकल चालवण्यासाठी, व्यायामासाठी ठराविक कपडेच परिधान करणं गरजेचं असतं, असं नाही. हाच संदेश देण्यासाठी ही खास रॅली महिलांसाठी आयोजित करण्यात आली होती.
यामध्ये, महिलांनी नऊवारी साडी चालवत अनेकांना धक्का दिला... या मॅरेथॉनमधून महिलांच्या फिटनेसबाबत जनजागृतीही करण्यात आली.