मुलींनो सावधान! लग्न जुळवणाऱ्या वेबसाईटवर भामटे असं लूटतात
मॅट्रीमोनी वेबसाईटवरून एका भामट्यानं महिलेला लाखोंचा गंडा घातला आहे. या भामट्याला वसई
वसई : मॅट्रीमोनी वेबसाईटवरून एका भामट्यानं महिलेला लाखोंचा गंडा घातला आहे. या भामट्याला वसई पोलिसांनी अटक केली असून, पुढील चौकशी सुरू आहे. विकास पाटील असं आरोपीचं नाव आहे. या भामट्यानं वईतील एका महिलेशी मॅट्रीमोनी वेबसाईटवर ओळख केली. त्यानंतर महिलेला लग्नाचं अमिष दाखवून वेळोवेळी तिच्याकडून पैसे उकळले. काही दिवसांनी हा भामटा महिलेशी कोणताही संपर्क न साधता पळून गेला.
मॅट्रीमोनी वेबसाईटवरून महिलेला लाखोंचा गंडा
- पुण्यातून भामट्याला अटक
- लग्नाचं अमिष दाखवून महिलेकडून उकळले 13 लाख रुपये
- वसई पोलिसांची कारवाई, चौकशी सुरू
आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच जानेवारी 2020 मध्ये महिलेनं पोलिसांत तक्रार दिली. अखेर वर्षभरानंतर पोलिसांनी पुण्यातून या भामट्याला अटक केली आहे. दरम्यान आरोपीचा मोबाईल तपासल्यानंतर तो दहा ते पंधरा महिलांच्या संपर्कात असल्याचं समोर आलं. आरोपीनं आणखी किती महिलांची अशा प्रकारे फसवणूक केली आहे, याबाबत पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.