देवेंद्र कोल्हटकर, मुंबई : मध्य रेल्वेच्या माटुंगा स्थानकावर सध्या महिलाराज पाहायला मिळतं आहे. याच कारण म्हणजे या स्थानकाच संपूर्ण व्यवस्थापन हे महिला कर्मचाऱ्यांमार्फत केलं जातं आहे. त्यामुळेच देशभरात मध्य रेल्वे वरील फक्त महिलांन मार्फत चालवलं जाणार माटुंगा हे पहिलं रेल्वे स्थानक ठरलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महिला स्पेशल लेडीज ट्रेन तुम्ही सगळ्यांनी पाहिली असेल...? पण आम्ही तुम्हाला सांगणार आहोत महिला स्पेशल रेल्वे स्टेशनबाबत. ते आहे सेंट्रल रेल्वेचं माटुंगा स्टेशन. येथे शत प्रतिशत महिलाराज आहे. म्हणजे स्टेशन मास्टर महिला. टीसी महिला. अनाऊन्सर महिला. आरपीएफ, महिला. सफाई कर्मचारी देखील महिलाच. मिळून सा-या 30 जणी या स्टेशनचा कारभार चालवत आहेत.


महिला आपल्या कर्तृत्वाचा झेंडा जगभर फडकवत असताना महिला सबलीकरण आणि सशक्तीकरणाच्या दृष्टीनंच मध्य रेल्वेनं हे पाऊल उचललं आहे. महिला ही जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडतील याची खात्री रेल्वे अधिका-यांना आहे.


प्रवाशांनी देखील मध्य रेल्वेच्या या लेडीज स्पेशल निर्णयाचं स्वागत केलं आहे. घर चालवण्यापासून ते अंतराळात महिलांनी मोठी झेप घेतली आहे. आपलं कर्तृत्व सिद्ध केलंय. आता मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय शहरात, जिथं रेल्वे ही लाईफलाईन मानली जाते त्या लाइफ लाइनच्या एका स्टेशनचं व्यवस्थापन महिला पाहणार, ही नक्कीच कौतुकास्पद आणि प्रेरणादायी बाब आहे.