वरळी गॅस सिलेंडर दुर्घटना : `त्या` शब्दावरून महापौर - शेलार यांच्यात जुंपली
आशिष शेलारांच ते विधान चर्चेत
मुंबई : वरळी केशव आळीत राहणाऱ्या पुरी कुटुंबियातील तिघांचा गॅस सिलेंडर स्फोटात मृत्यू झाला. या प्रकरणावरून भाजपचे आमदार आशिष शेलार आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यात चांगलीच जुंपली आहे. आशिष शेलारांच्या 'त्या' शब्दाची महिला आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. असं असतानाच आता पुन्हा शेलार- पेडणेकर यांच्यात टीकास्त्र सुरू झालं आहे.
आशिष शेलारांचं पेडणेकरांना प्रत्युत्तर
मी त्यांना त्याच्या भाषेत उत्तर दिले तर वाईट वाटेल, मी मुंबईकरांच्या विषयी मुद्दे मांडत राहील. महापौर यांनी त्याच्या कार्यालयात जास्त सजगता आणावी, बीएमसीकडे सीएजी पत्र पाठवत असतात. पुरावे त्याच्याकडे असतात पण डोके उघडे ठेवले तर मिळेल. (वरळी गॅस दुर्घटना : अनाथ बालकाच पालकत्व शिवसेना स्विकारणार - महापौर)
महापौर अणि महिला विषयी वादग्र्रस्त विधान केले नाही. शिवसेना सारखा पाखंडीपणा भाजपाचा नसतो. तक्रार करा सत्य समोर येईल. महापौर मॅडम यांना विनंती सोशल मिडीयावर लिहीले जाते याकडे त्यांनी लक्ष द्सावे. आशिष शेलारांनी महापौरांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलंय.
आशिष शेलार भ्रमिष्ट झालेत - महापौर
आशिष शेलार भ्रमिष्ट झालेत. पक्षात मानसन्मान मिळत नसल्याने ते भ्रमिष्ट झालेत. महिलेबद्दल निजल्या हा शब्द ते वापरतात आणि पुन्हा पुन्हा तो शब्द वापरतात. आज साडेतीन वाजता महिला आघाडी पोलिसांना भेटणार. कोवीड काळात हे कुठे निजले होेते आणि अंगाई गात होते? गोरखपूरमध्ये ६० मुले ऑक्सीजविना गेली तेव्हा तुमच्या संवेदना कुठे गेल्या होत्या?असा सवालही महापौरांनी विचारला आहे.