Worli Hit and Run Case : पुणे पोर्श कार (Pune Porsche car accident) अपघाताच्या चर्चा आणि या प्रकरणाला मिळणारी वळणं विस्मृतीत जात नाहीत तोच आणखी एका हिड अँड रन प्रकरणानं यंत्रणांसह प्रशासनालाही हादरा दिला. राज्यात मागील काही दिवसांपासून सातत्यानं वाढत जाणाऱ्या Hit and Run प्रकरणांमधील एक घटना नुकतीच मुंबईतील वरळी इथं घडली. जिथं मुंबईच्या ससून डॉक इथून परतत असतानाच दुचाकीवर असणाऱ्या कावेरी नाखवा आणि प्रदीप नाखवा यांना भरधाव वेगात असणाऱ्या बीएमडब्ल्यू कारनं धडक दिली. हा अपघात इतक्या भीषण स्वरुपातील होती गंभीररित्या दुखापतग्रस्त झाल्यामुळं कावेरी नाखवा यांनी प्राण गमावला तर, प्रदीप नाखवा यांना जबर दुखापत झाल्याची बाब समोर आली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वरळीतील या हिट अँड रन प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळताच तातडीनं सूत्र हलली आणि आता पुढील पोलीस तपासातून अतिशय महत्त्वाचे आणि धकाकादायक धागेदोरे समोर आले. आरोपी मिहीर शाह चालवत असणारी कार लपवण्याचा डाव समोर आला असून, कारवर असणारं राजकीय पक्षाचं चिन्हं आणि नंबरप्लेट बदलण्याचा प्रयत्न केल्याचीही खळबळजनक महिती समोर आली. 


‘तू पळून जा...' 


वरळी हिड अँड रन प्रकणातील आरोपी मिहिरला त्याच्याच वडिलांनी म्हणजेच शिवसेना उपनेते राजेश शाह यांनी या अपघातानंतर पळून जाण्याचा सल्ला दिल्याचं पोलीस तपासातून उघड झालं. 


शिवसेना उपनेते राजेश शाहंनी वरळीतील अपघातानंतर मुलगा नव्हे, चालक गाडी चालवत असल्याचं सांगू, तू पळून जा असा सल्ला दिला होता. प्रदीप आणि कावेरी नाखवा यांच्या दुचाकीला धडक दिल्यानंतर आरोपी मिहीरनं वडील राजेश शाहशी संपर्क साधला तेव्हा त्याला हा सल्ला देण्यात आला होता. 
चालक राजऋषी बिडावत याच्याकडून अपघात झाल्याचं सांगू असं शाहंनी लेकाला बेधडकपणे सांगितल्याची धक्कादायक बाब समोर आल्यानं यंत्रणेच्याही भुवया उंचावल्या आहेत. 


हेसुद्धा वाचा : 'मी राज्याच्या मुख्यमंत्री असेपर्यंत...'; CM शिंदेंनी राज्याच्या जनतेला स्पष्टच सांगितलं


 


अपघातानंतर मुलाला पळून जाण्यास मदत केल्याच्या आरोपाअंतर्गत पोलिसांच्या अटकेत असणाऱ्या राजेश शहा यांना सोमवारी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. पण, 15000  रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. तर, दुसरा आरोपी राजऋषी बिडावतला न्यायालयानं एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. सूत्रांच्या माहितीनुसार राजऋषी हा शाह  कुटुंबीयांचा चालक असून, अपघातावेळी तो मिहिरच्या शेजारीच कारमध्ये बसला होता.


हेसुद्धा वाचा : Worli Hit And Run प्रकरणातील मृत महिला 'या' ज्येष्ठ अभिनेत्याची पुतणी; 'फाशीची शिक्षा द्या..' आक्रोश करत त्यांची मागणी


 


वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार सध्या या प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाह याचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलिसांनी 11 पथकं स्थापन केली असून, गुन्हे शाखेकडूनही आरोपीचा शोध घेतला जात आहे.