मुंबई  :  खासगी वाहनांवर पोलीस अथवा पोलिस चिन्हे वापरण्यास मनाई केली आहे.  मुंबई पोलिसांसाठी हा आदेश निघाला असून, इतर पोलीस आयुक्तालयात लागू होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


अनेकवेळा आपल्या परिसरात पोलीस नाव असलेली वाहनं येता जाताना दिसतात. पोलीस कर्मचाऱ्यांचे नातेवाईक देखील आपल्या वाहनांवर पोलीस नाव आणि लोगो लावून मिरवीत असतात. 


काही वाहनावर पोलीसांचे लोगो देखील असतात. नागरिकांकडून अशा अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत की, पोलीस कर्मचारी नसलेली लोक देखील वाहनांवर नाव आणि लोगो लावतात. 


त्यामुळे मुंबई पोलिसांनी आदेश काढले आहेत की, अशी नावे खासगी वाहनांवर निदर्शनास आल्यास शिस्त भंग कारवाई केली जाणार आहे.