रेल्वेच्या खांबावर चढून प्रवाशांचा खोळंबा करणारा तरुण ताब्यात
युवकाला खाली उतरविल्यामुळे अनर्थ टळला आहे.
मुंबई : आज संध्याकाळच्या सुमारास मंगल यादव या 20 वर्षीय युवक ठाण्यातील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आणि दोनच्या मध्ये इलेक्ट्रोनिक खांबावर चढला होता. यामुळे मुंबईहुन ठाण्याच्या दिशेने येणारी सेवा थांबविण्यात आली होती. या सर्वात कामाहून घरी जाणाऱ्या शेकडो प्रवाशांचा खोळंबा झाला होता. अखेर या युवकाला खाली उतरविल्यामुळे अनर्थ टळला आहे.
रेल्वे पोलीस आणि फायर ब्रिगेड च्या जवानांनी त्याला खाली उतरवले. त्या युवकाला आता पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे. आता रेल्वे पोलीस यासंदर्भात पुढचा तपास करत आहेत. प्राथमिकरित्या हा युवक मानसिक रुग्ण वाटत आहे. परंतु यामुळे जवळपास २० ते २५ मिनिट लोकल थांबवाव्या लागल्या आणि नाहक प्रवाशांना याचा त्रास झाला आहे.