मुंबई : ४ वर्षाच्या आराध्य मुळेला अखेर हृदय मिळालं आणि हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया देखील यशस्वी पार पडली. ही शस्त्रक्रिया मंगळवारी सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत मुलुंड येथील फोर्टिस रूग्णालयात यशस्वी पार पडली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या दीड वर्षापासून योगेश मुळे आराध्यासाठी हृदय शोधत होते. सोशल मीडियावर याची एक मोहीम देखील सुरू झाली होती. या मोहिमेत अनेक अनेकांनी सहभाग घेतला होता. अखेर मुळे कुटुंबीय, माय मेडिकल मंत्राला यश आलं आणि आराध्याला हृदय मिळालं. 


आराध्याला हृदय देणाऱ्या 'दिल'दारची कहाणी 


शाह कुटुंबियांना अनेक वर्ष अपत्य होत नव्हते म्हणून त्यांनी नवस केले. अखेर त्यांना गेल्यावर्षी सोमनाथ हा गोंडस मुलगा झाला. नवसाने मुलगा झाला म्हणून शाह कुटुंबीय अतिशय खुष होते. मात्र १४ महिन्याचा सोमनाथ २ सप्टेंबर रोजी घरात खेळताना सोमनाथ शिडीहून कोसळला आणि डोक्याला मार लागल्याने गंभीर जखमी झाला. सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्याला 4 सप्टेंबर रोजी ब्रेनडेड घोषित करण्यात आलं. त्यानंतर रुग्णालयाने ‘डोनेट लाईफ’ या एनजीओशी संपर्क साधला. एनजीओकडून सोमनाथच्या आई-वडिलांना अवयवदान करण्यासाठी प्रेरित करण्यात आलं.


गेल्या वर्षी आमचा नवस पूर्ण झाला आणि सोमनाथचा जन्म झाला. मात्र तो आम्हाला एवढ्या लवकर सोडून जाईल, असं कधीही वाटलं नव्हतं. आम्ही मुलगा तर गमावला. मात्र तो आराध्याच्या रुपाने अजूनही जिवंत आहे. सोमनाथच्या अंत्यसंस्कारानंतर आराध्याला भेटण्यासाठी मुंबईला जाऊ’’, असं सोमनाथच्या आई-वडिलांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’शी बोलताना सांगितलं.


सोमनाथने जाता जाता आराध्यासोबतच एका दहा वर्षांच्या मुलालाही सोमनाथच्या किडनीने नवं आयुष्य मिळणार आहे. सोमनाथची किडनी आणि लिव्हर अहमदाबादच्या इंस्टिट्यूट ऑफ किडनी डीजीजेज अँड रिसर्च सेंटर इथे पाठवण्यात आलं आहे.