मुंबई : अभिनेता सलमान खानच्या मुंबईतील घरासमोर, गॅलेक्सी अपार्टमेंटसमोरून १९ वर्षाच्या युवकाने १२ मोबाईल लांबवले आहेत. सलमान खान जोधपूर जेलमधून सुटून आला, त्यावेळी त्याच्या घरासमोर त्याच्या फॅन्सची गर्दी झाली होती, सलमान त्याचे फॅन्स हात देण्याच्या गोंधळात असताना, या मुलाने चक्क १२ मोबाईल लांबवले. मुंबईतील वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटसमोर हा प्रकार घडला. या मोबाईल चोरी प्रकरणी पोलिसांनी विशाल यादव या १९ वर्षाच्या युवकाला अटक केली आहे.


काही मिनिटात त्या मुलाने केली ही हातसफाई


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वांद्रे पूर्वला राहणाऱ्या विशाला यादवने, सलमानच्या घरासमोर वांद्रे पश्चिमला गर्दीच्या खिशातून १२ मोबाईल फोन लांबवले, विशाल यादवने ही हातसफाई काही मिनिटात केली. आपल्या आवडत्या अभिनेता १९९८ च्या काळवीट शिकार प्रकरणात, २ दिवस जेलची हवा खाऊन परत आल्याचा आनंद फॅन्सना होता. सलमान खानला वेलकम करत असताना त्याने हा कारनामा केला.


१२ पैकी एवढे मोबाईल झाले हस्तगत


यादव या बॅण्डस्टॅण्ड गॅलेक्सी अपार्टमेंटच्या गर्दीच्या खिशातून, पर्समधून मोबाईल लंपास करत होता. आम्ही त्याच्याकडून २ मोबाईल फोन हस्तगत केलेले आहेत, आणि १० मोबाईल फोन त्याच्याकडून हस्तगत करण्याचं काम सुरू असल्याचं पोलिसांनी आहे, वांद्रे पोलीस स्टेशनचे सिनिअर इन्स्पेक्टर पंडित ठाकरे यांनी ही माहिती दिली आहे.


पोलिसांनी त्याला रात्रीत ताब्यात घेतलं


या गर्दीत आणखी काही मोबाईल चोर होते का याचा शोध पोलीस घेत आहेत. या गर्दीत मोबाईल चोरीला गेल्याची तक्रार आल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरूवात केली.पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल यादवला रात्रीच्या पोलीस पेट्रोलिंग टीमने शनिवारी रात्री हेरलं आणि त्याने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली.


आरोपी विशाल यादवला स्थानिक कोर्टात हजर करण्यात आलं, त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली असल्याचं पोलिसांनी सांगितलं.