मुंबई : मुंबई विद्यापीठमध्ये स्टुडट  कौन्सिल निवडणुकीत युवासेनेने  यश  मिळवले. त्यानंतर शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी  निवडणूक लादली पण तरीही यशस्वी झालो, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.


युवासेनेचा विजय


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषद निवडणुकीत युवासेनेने विजय मिळवत भगवा फडकवला. काल झालेल्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत युवासेनेच्या सानिया नागुठणे  यांनी ‘अभाविप’च्या सुरज यादव यांचा १० विरुद्ध २ अशा फरकाने धुव्वा उडवला. परिषदेच्या सचिव पदी युवासेनेच्या ग्रॅविल गोन्सालवीस यांची याआधीच बिनविरोध निवड झाली आहे. या विजयानंतर शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले.


युवासेनेने सिनेटचे खाते  


विद्यापीठ कायद्यानुसार विद्यार्थी परिषदेच्या अध्यक्ष आणि सचिवांना सिनेट व व्यवस्थापन परिषदेच्या सदस्याचा दर्जा मिळणार आहे. त्यामुळे आगामी सिनेट निवडणुका होण्याआधीच आपोआपच युवासेनेचे सिनेटचे खाते उघडले आहे.


'शिक्षणमंत्र्यांकडून फसवणूक'


स्टुडट कौन्सिल निवडणूक जोरदार यश शिवसेनेनी प्राप्त केले. गेली काही वर्ष आम्ही सिनेट निवडणूक लढविण्याचे बंद केले होते. पण कॉलेज येथे राजकारण करायचे सरकारने ठरवले होते. शिक्षण मंत्री यांनी फसवणूक केली आणि निवडणूक लढवणार नाही, असे जाहीर केले पण अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेने  अर्ज दाखल केले.  त्यामुळे नाईलाजाने ही निवडणूक लढलो, असेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले.