`झी २४ तास` इम्पॅक्ट : विद्यापीठाला आली जाग
मुंबई विद्यापीठानं घातलेल्या गोंधळामुळे विद्यार्थी, पालक, शिक्षक, सरकार आणि सगळेच चक्रावलेत. पण, `झी २४ तास`नं लक्षात आणून दिलेल्या एका चुकीनंतर विद्यापीठानं जागं होत आपली चूक सुधारलीय.
मुंबई : मुंबई विद्यापीठानं घातलेल्या गोंधळामुळे विद्यार्थी, पालक, शिक्षक, सरकार आणि सगळेच चक्रावलेत. पण, 'झी २४ तास'नं लक्षात आणून दिलेल्या एका चुकीनंतर विद्यापीठानं जागं होत आपली चूक सुधारलीय.
मुंबई विद्यापीठानं पदवीच्या निकालांबाबतचा घातलेला गोंधळ संपत नाही तोवर दुसरा गोंधळ घातला. पदवीचे निकाल अजून लागलेले नसताना महाविद्यालये आणि मुंबई विद्यापीठाच्याच पोस्ट ग्रॅज्यूएशन विभागांनी प्रवेशाची मुदत वाढवून देण्यास नकार दिला. मात्र 'झी २४ तास'नं या भोंगळ कारभाराचं वृत्त दाखवताच विद्यापीठ प्रशासनाला जाग आली.
पोस्ट ग्रॅज्युएशनचे प्रवेश ३१ ऑगस्टपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश प्रभारी कुलगुरूंनी दिले. 'झी २४ तास'च्या बातमीनंतर कुलगुरूंनी परिपत्रक काढून सर्व विभागांना सूचना दिल्या.
तर दुसरीकडे निकालाच्या गोंधळावरून हायकोर्टानं पुन्हा मुंबई विद्यापीठावर ताशेरे ओढले आहेत. विद्यापीठाच्या भोंगळ कारभारामुळे यंदाच्या निकालांची परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याचा ठपका मुंबई हायकोर्टानं ठेवला. निकालाच्या दिरंगाईविरोधात विधी विभागाच्या विद्यार्थ्यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती.