मुंबई : मराठी संस्कृती जपणाऱ्या आणि मराठमोळी अभिरूची जोपासणाऱ्या 'झी मराठी'नं आता मराठी जनांसाठी खास भेट आणलीय... 'झी मराठी दिशा'च्या स्वरुपात... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'झी समूहा'च्या वतीनं सुरू करण्यात आलेल्या या नव्या आठवडापत्राचं प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सायंकाळी समारंभपूर्वक झालं. एस्सेल समूहाचे शिल्पकार आणि मार्गदर्शक, राज्यसभा खासदार सुभाष चंद्रा, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर आदी मान्यवर या प्रकाशन सोहळ्याला उपस्थित होते.



हे नवे आठवडापत्र महाराष्ट्राला दिशा देणारं ठरेल, अशा शब्दांत सर्वच मान्यवरांनी झी मराठी दिशाला खास शुभेच्छा दिल्या. या आठवडापत्रासाठी व्यंगचित्र काढण्याची ग्वाही राज ठाकरेंनी यावेळी दिली... तर व्यंगचित्र काढा, पण माझं पोट थोडं कमी लठ्ठ दाखवा, अशी मिश्किल विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली.