स्पर्धेत सहभागी व्हा आणि जिंका आकर्षक बक्षिसे
`झी मराठी दिशा` च्या वाचकांना आकर्षक बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी आम्ही घेऊन आलो आहोत. यासाठी काही स्पर्धांमध्ये तुम्हाला सहभाग घ्यावा लागणार आहे.
मुंबई : 'झी मराठी दिशा' च्या वाचकांना आकर्षक बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी आम्ही घेऊन आलो आहोत. यासाठी काही स्पर्धांमध्ये तुम्हाला सहभाग घ्यावा लागणार आहे.
तरुणांसाठी 'लेख स्पर्धा'
'बलशाली भारतासाठी मी काय करू शकतो/ शकते?' तरुणांनो व्यक्त व्हा आणि ३०० शब्दांपर्यंत लेख लिहून पाठवा.
तुमचे लेख आमच्यापर्यंत १० जानेवारीपर्यंत पोहोचले पाहिजेत, अशा पद्धतीने पाठवा. ही स्पर्धा १८ ते ३० वयोगटातील तरुणांसाठी आहे.
'चौकस-चौरस संग्रह स्पर्धा'
'झी मराठी दिशा'अंतर्गत तिसरी ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी 'चौकस-चौरस संग्रह स्पर्धा' घेण्यात येत आहे. चौकस चौरस पानावरील बोधकथा, श्लोककथा, शब्द गंमत, नवल आणि परिसर परिचय ही पाच सदरे वाचून त्याची कात्रणे वाचून त्याची संग्रहवही करायची आहे.
६ जानेवारी ते ३० एप्रिल २०१८ हा स्पर्धेचा कालावधी असेल. ७ मे २०१८ पर्यंत ही संग्रहवही आमच्याकडे पाठवायची आहे.
विजेत्यांना आकर्षक बक्षिसे मिळतील.
इथे करा संपर्क
तुमचा लेख zeemarathidisha@dnaindia.net या ईमेलवर पाठवा
किंवा झी मराठी दिशा,मॅरेथॉन फ्युचरेक्स, ए-विंग, १४वा मजला,ना. म. जोशी मार्ग, लोअर परळ (पूर्व) मुंबई - ४०० ०१३. या पत्त्यावर पाठवू शकता.