मुंबई : कोरोनाचा संपूर्ण जगाला मोठा फटका बसला आहे. महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्था कोरोनामुळे कोलमडली आहे. असं असताना कोरोनानंतरचा महाराष्ट्र कसा असेल? हा प्रश्न साऱ्यांनाच पडला आहे. यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी झी चोवीस तासच्या ' ई-संवाद - महाराष्ट्र एक पाऊल पुढे'  याखास कार्यक्रमात आपलं मत व्यक्त केलं. कोरोनानंतरचं राज्याचं व्हिजन काय असेल? यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काय म्हणाले? ते पाहा... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनाने काही गोष्टी शिकवल्या, स्वतकडे कुटुंबाकडे, शिक्षण, आरोग्याकडे पाहायला शिकवलं


- आजपर्यंत शिक्षण आरोग्य याला तेवढं प्राध्यानं दिलं गेलं नसेल, कदाचित


- पुढचं आयुष्य जगताना जीवनावश्यक वस्तू आणि जीवनावश्यक गोष्टी जशा सुरू ठेवल्या, तसंच शिक्षणही कसं सुरू ठेवता येईल त्याकडे लक्ष ठेवण्याची गरज आहे


- आरोग्य सुविधा मोठ्या प्रमाणावर वाढवण्याची गरज


- येत्या काळात आरोग्य आणि शिक्षणाला प्राधान्य देणार


- शहर आणि ग्रामीण भागात जिल्ह्यांच्या आवश्यकतेनुसार इन्फेक्शन हॉस्पिटलची सुविधा सज्य ठेवणार. इतरवेळी तिकडे बाकीचे कार्यक्रम लग्न, प्रदर्शन, कृषी प्रदर्शन होतील. गरज लागली तर तिकडे २-३ दिवसात हॉस्पिटल उभारलं जाईल


- २४ तास मास्क लावला आणि ५ सेकंद तो काढून हात न धुता तो तोंडाला लावला, तर २४ तास मास्क लावण्याचा काहीही परीणाम होणार नाही