एनसीपीचे नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी नऊ लोकांना अटक करण्यात आली. आमदार आणि बाबा सिद्दीकी यांचे पूत्र झिशान सिद्दीकी यांनी शुक्रवारी एक क्रिप्टिक पोस्ट केली आहे. याच दिवशी त्यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीत झिशान सिद्दीकी यांनी फडणवीस यांना आपल्या वडिलांच्या हत्येबाबत पोलीस तपास कुठपर्यंत पोहोचल्याच सांगितलं. या अगोदर गुरुवारी झिशान सिद्दीकीने आपल्या कुटुंबाला न्याय मिळावा या उद्देशाने पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये त्याने विनंती केली होती की, माझ्या वडिलांच्या निधनाचं राजकारण करु नये. तसेच ते व्यर्थ देखील जाऊ देऊ नका. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यानंतर पुन्हा एकदा झिशान सिद्दीकी यांनी X वर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये झिशान सिद्दीकी यांनी लिहिलं आहे की, 'जे लपलेलं आहे किंवा दिसत नाही त्याचा अर्थ असा नाही की, ते झोपलंय. तसेच जे सहज समोर दिसतंय ते गरजेचं नाही की, ते बोलत असेल.' झिशान सिद्दीकी यांनी केलेली की क्रिप्टीक पोस्ट बरचं काही सांगून जात आहे. 


झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाजवळ बाबा सिद्दीकी यांची हत्या झाली. आता पोलीस तपासात मिळालेल्या माहितीनुसार, झिशान सिद्दीकी यांच्यादेखील हत्येचा कट रचण्यात आला होता. झिशान सिद्दीकी यांचा फोटो आरोपींच्या मोबाइलमध्ये आढळल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 



झिशान सिद्दीकींनी घेतली होती फडणवीसांची भेट


झिशान सिद्दीकी यांनी शुक्रवारी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारमध्ये फडणवीस यांच्याकडे गृहखातेही आहे. आपल्या वडिलांच्या हत्येप्रकरणी आतापर्यंत झालेल्या पोलिस तपासाची माहिती झिशान सिद्दिकी यांनी गृहमंत्र्यांना दिली आहे.


न्यायाची मागणी 



याआधी गुरुवारी झिशान सिद्दीकीने आपल्या कुटुंबीयांना न्याय देण्याची मागणी केली होती. तसेच वडिलांच्या मृत्यूचे राजकारण करू नये आणि ते व्यर्थ जाऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले.


बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या


बाबा सिद्दीकी यांची 12 ऑक्टोबर रोजी मुंबईतील वांद्रे भागातील निर्मल नगर येथील झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाजवळ गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी आतापर्यंत 9 जणांना अटक करण्यात आली असून, यातील पाच जणांना शुक्रवारी रायगड जिल्ह्यातील पनवेल आणि कर्जत येथे छापे टाकून अटक करण्यात आली.