नवी दिल्ली : भारतात अशा अनेक अंधश्रद्धा आहेत ज्यावर भारतीय डोळे बंद ठेवून विश्वास करतात. अशा गोष्टी करण्यामागे कोणतेही ठोस कारण नसते मात्र पूर्वापार चालत असल्याने विश्वास माणसे विश्वास ठेवतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतात असे अनेक लोक आहेत जे मंगळवारी केस कापत नाहीत. अधिकतर घरांमध्ये मंगळवारी केस कापणे वर्ज्य मानले जाते. 


घरात छत्री उघडू नये असे म्हटले जाते. असे केल्याने घरातील काही वस्तूंचे नुकसान होते. 


तुम्ही अनेकदा गाडी, घरे, दुकांनांमध्ये लिंबू-मिरची लावलेली पाहिली असेल. असं म्हटलं जात की हे लावल्याने वाईट नजर लागत नाही. 


घरात तुटलेली काच कधीही ठेवत नाहीत. फुटलेल्या आरशात पाहिल्यास नशीबावर त्याचा परिणाम होतो. 


सूर्य मावळल्यानंतर नख, केस कापू नका असे सांगितले जाते. तसेच संध्याकाळच्या वेळेस केरकचरा काढला जात नाही.