मुंबई : भगवान शिव जितके रहस्यमय आहेत. तेवढी त्यांची वेशभूषा आणि त्या संबंधी तथ्य़ विचित्र आहेत. शिव स्मशानात निवास करतात, गळ्यात नाग धारण करता, भांग आणि धतुरा सेवन करतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज आम्ही तुम्हांला भगवान शंकराबाबत अशा काही गोष्टी सांगणार आहोत त्यात लाइफ मॅनेजमेंट संबंधी सूत्र सांगण्यात आला आहे. 


१) का आहे भगवान शंकराचे तीन डोळे 


धर्मग्रंथानुसार सर्व देवतांना दोन डोळे आहेत. पण एकमात्र शंकर असे देवता आहेत ज्यांना तीन डोळे आहेत. तीन डोळे असल्याने त्यांना त्रिनेत्रधारी म्हणतात. लाइफ मॅनेजमेंटच्या दृष्टीने पाहिले तर शंकराचा तिसरा डोळा प्रतिकात्मक आहे.  दोन डोळ्यांनी आपले नेहमीची कामे होतात. जीवनात असे काही क्षण असतात की त्यावेळी अंतप्रेरणेची गरज असते. शंकराचा तिसरा डोळा हा आज्ञा चक्राच्या स्थानावर असतो. त्यामुळे परिस्थितीनुसार स्वतःला आज्ञा देऊन हा तिसरा डोळा प्रत्येकाने उपयोगात आणला पाहिजे असे शंकराचा तिसरा डोळा सांगतो. 


२) शंकराच्या शरिरावर भस्म का


धर्मशास्त्रानुसार सर्व देवीदेवता वस्त्र आणि आभूषणे परिधान केलेले असतात. पण भगवान शंकर मृग चर्म (हरीणची चामडी ) कमरेला आणि भस्म अंगाला लावलेले आहे. भस्म शिवाचे प्रमुख वस्त्र आहे. कारण शिवाचे संपूर्ण शरिर भस्माने झाकलेले असते.  भस्माने शरीराचे रोम छिद्र बंद होते. त्यामुळे उन्हाळ्यात गर्मी लागत नाही आणि हिवाळ्यात थंडी लागत नाही. तसेच भस्म एखाद्या औषधासारखे काम करते.  परिस्थितीनुसार आपल्याला वागले पाहिजे. हे  भगवान शिव सांगतात. 


३) भगवान शंकराच्या हातात त्रिशूळ का


शंकराचे मूळ अस्त्र त्रिशूळ आहे. हे अस्त्र प्रतिकात्मक आहे. हे अस्त्र खूप गूढ गोष्टी सांगतो. या जगात सत, रज आणि तम या तीन प्रकारच्या प्रवृत्ती असतात. सत म्हणजे सात्विक, रज म्हणजे सांसारिक आणि तम म्हणजे तामसी... प्रत्येक मनुष्यात या प्रवृत्ती असतात. पण त्या कमी जास्त प्रमाणात असतात. त्रिशूळच्या टोकावर या तीन प्रवृत्ती असतात. शंकर सांगतात. या तीन प्रवृत्तींचा वापर करताना खूप नियंत्रण केले पाहिजे. 


४) शंकराने का प्यायले विष 


देव आणि दानवांनी समुद्र मंथन केले होते. त्यावेळी विष निघाले. विष घ्यायला कोणी तयार नव्हते त्यावेळी शंकरानी आपल्या कंठामध्ये विष धारण केले. त्यामुळे त्यांचे कंठ निळे झाले. त्यामुळे त्यांना निळकंठ म्हटले जाते. 
समुद्रमथंनचा अर्थ मनाचे मंथन.. शंकराने हे विष आपल्या कंठात धारण केले त्याला आपल्यावर प्रभावित होऊ दिले नाही. 
विष म्हणजे वाईट प्रवृत्ती. त्यांच्यावर शंकराने विजय मिळविला. 


५) भगवान शंकरला का अर्पण केला जातो भांग-धतुरा 


भगवान शंकर भांग आणि धतुऱ्याने प्रसन्न होतात. भांग आणि धतुरा नशेसाठी वापरतात. लाइफ मॅनेजमेंटनुसार शंकराला भांग आणि धतुरा  अपर्ण केल्यास आपली वाईट सवय दूर होते. त्यामुळे असा संकल्प करा की आपण नशेच्या वस्तू बाळगणार नाही, त्या देवाला अर्पण करून आपण त्यापासून दूर राहू..