शौचालय आणि स्नानघर वास्तुदोषमुक्त करण्यासाठी ५ उपाय
वास्तुशास्त्रानुसार शौचालय आणि स्नानघर यामध्ये जर वास्तुदोष असला तर आर्थिक स्थितीवर तर प्रभाव पडतोच पण आरोग्यावर ही याचा परिणाम होतो. त्यामुळे घरात असलेल्या स्नानगृह आणि शौचालय याचा वास्तूदोष दूर करुन घ्यावा.
मुंबई : वास्तुशास्त्रानुसार शौचालय आणि स्नानघर यामध्ये जर वास्तुदोष असला तर आर्थिक स्थितीवर तर प्रभाव पडतोच पण आरोग्यावर ही याचा परिणाम होतो. त्यामुळे घरात असलेल्या स्नानगृह आणि शौचालय याचा वास्तूदोष दूर करुन घ्यावा.
वास्तूशास्त्रनुसार शौचालय आणि स्नानघर एकत्र नसलं पाहिजे. मोठ्या शहरांमध्ये जागा कमी असल्याने स्नानघर आणि शौचालय हे बहुतेकदा सोबतच असतात. ज्यामुळे वास्तूदोष बनतो. पण यावर देखील एक उपाय सांगण्यात आलेला नाही आहे.
१. शौचालयात काचेच्या वाटीत मीठ भरुन ठेवलं पाहिजे आणि आठवड्यातून एकदा बदला पाहिजे.
२. घरातील उत्तर पूर्व दिशेला शौचालय आणि स्नानघर असलं पाहिजे. भींतीवर उत्तर किंवा पूर्व दिशेला एक आरसा देखील लावला पाहिजे.
३. शौचालयाच्या दक्षिण भीतींवर पिरामिड लावावे. हे वास्तूदोष दूर करतो.
४. स्नानघरात निळ्या रंगाची बादली आणि मग वापरावा.
५. शौचालय आणि स्नानघराचं दार नेहमी बंद ठेवा. पण दरवाजासमोर आरसा लावू नका.