नवी दिल्ली : तुमचा भविष्यावर विश्वास आहे का? तुमचं उत्तर हो असेल तर चिनी कॅलेंडरनुसार तुमचं यंदाच वर्ष कसं असेल याबाबत ही माहिती आम्ही देतोय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

News.abs-cbn.comच्या रिपोर्टनुसार तुम्ही कोणत्या वर्षात जन्मला आहात त्यानुसार तुमचे भविष्य देण्यात आले आहे. 


उंदीर - १९२४, १९३६, १९४८, १९७२, १९८४, १९९६ आणि २००८ या वर्षात जन्मलेल्या व्यक्ती नोकरदार असतील पगारवाढीची शक्यता आहे. प्रेमसंबंधात जपून राहावे. तसेच आरोग्याची काळजी घ्या.


माकड - १९३२, १९४४, १९५६, १९६८, १९८०, १९९२ आणि २००४ या वर्षात जन्मलेल्या व्यक्तींनी भांडणापासून दूर रहावे. तणाव टाळावा. 


मेंढी - १९३१, १९४३, १९५५, १९६७, १९७९, १९९१, २००३ आणि २०१५ या वर्षात जन्मलेल्या व्यक्तींना हे वर्ष अनूकूल असणार आहे. आर्थिक प्रगती होईल. योग्य आहार घ्या. 


घोडा - १९३०, १९४२, १९५४, १९६६, १९७८, १९९०, २००२, २०१४ या वर्षात जन्मलेल्या व्यक्तींना या वर्षात अनपेक्षित लाभ होण्याची शक्यता आहे. यंदाच्या वर्षात शक्यतो लग्न करु नका. 


साप - १९९२, १९४१, १९५३, १९६५, १९७७, १९८९, २००१, २०१३ या वर्षात जन्मलेल्या व्यक्ती या वर्षात करिअरला प्राधान्य देतील. फेब्रुवारी आणि ऑगस्ट या महिन्यात काळजी घ्यावी. आरोग्य जपावे. 


ड्रॅगन - १९२८, १९४०, १९६४, १९७६, १९८८, २०००, २०१२ मध्ये जन्मलेल्या व्यक्तींनी सावधपणे वाहने चालवावीत. गुंतवणूक टाळावी. गैरसमज होण्याची शक्यता. 


ससा - १९२७, १९३९, १९५१, १९६३, १९७५, १९८७, १९९९ आणि २०११मध्ये जन्मलेल्या व्यक्तींचे अचानक प्रोमोशन होण्याची शक्यता आहे. विवाह होण्याची शक्यता. शत्रूंचा त्रास संभवतो. 


वाघ - १९२६, १९३८, १९५०, १९६२, १९७४, १९८६, १९९८ आणि २०१० मध्ये जन्मलेल्या व्यक्तींना प्रवासामुळे अधिक उत्साह येईल. आरोग्याच्या तक्रारी संभवतात. 


बैल - १९२५, १९३७, १९४९, १९६१, १९७३, १९८५, १९९७ आणि २००९. या वर्षात ज्यांचा जन्म झालाय त्या व्यक्ती कामाच्या ठिकाणचे वातावरण बदलास कारणीभूत ठरतील. लग्नासाठी योग्य काळ. आरोग्याची काळजी घ्या.


कोंबडा - १९३३, १९४५, १९५७, १९६९, १९८१, १९९३, २००५ या वर्षात जन्मलेल्या व्यक्ती व्यापारात प्रगती करतील. या वर्षात तुम्हाला नवीन संधी उपलब्ध होतील. बचत होईल. 


कुत्रा - १९३४, १९४६, १९५८, १९७०, १९८२, १९९४, २००६मध्ये जन्मलेल्या व्यक्तींनी या वर्षात पैसा जपून वापरावा. वजन कमी करण्यावर लक्ष द्यावे. रागावर नियंत्रण ठेवावे.